pm narendra modi praised singer aarya ambekar suresh vadkar song hriday mein shri ram hain SAKAL
मनोरंजन

Pm Modi - Aarya Ambekar: मोदींनी घेतली मराठी कलाकारांच्या गाण्याची दखल, आर्या आंबेकर म्हणाली, "श्रीरामाचा आशीर्वाद जणू.."

पंतप्रधान मोदींनी आर्या आंबेकर - सुरेश वाडकर यांच्या गाण्याचं कौतुक केलंय

Devendra Jadhav

Pm Modi - Aarya Ambekar News: सध्या संपूर्ण भारतात नागरिकांना अयोध्या राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता आहे. २२ तारखेला अयोध्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. अनेक गायक - संगीतकार या सोहळ्यानिमित्ताने श्रीरामाला समर्पित गाणं लोकांच्या भेटीला आणत आहेत.

अशातच पंतप्रधान मोदींनी मराठी कलाकारांनी गायलेल्या हृदय में श्रीराम या गाण्याची दखल घेतली आहे. काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान मोदींनी आर्या आंबेकरच्या गाण्याचं कौतुक

पंतप्रधान मोदींनी आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाण्याचं कौतुक केलंय. मोदी लिहीतात, "अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात संपूर्ण देश भगवान श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या मधुर सुरांमध्ये ही भावना व्यक्त केली आहे."

असं म्हणत मोदींनी आर्या आबंकेर - सुरेश वाडकर यांनी गायलेल्या हृदय में श्रीराम गाण्याची लिंक शेअर केलीय.

आर्या आंबेकर भावूक होत म्हणाली...

पंतप्रधान मोदींनी गाण्याची दखल घेतल्याबद्दल आर्या आंबेकर पोस्ट शेअर करत म्हणाली, "जय श्रीराम. ज्यांच्या कार्याने मी प्रभावित होते असे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या या पोस्टने माझ्या डोळ्यात पाणी आलं. असा पराकोटीचा आनंद कधीच अनुभवला नाही.. हा आनंद फक्त शब्दात मांडता येणार नाही!!! आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू पोचला, अशी आमची भावना निर्माण झाली.

प्रिय मोदीजी, 22 जानेवारीला मोठा दिवस साजरा करण्यासाठी आमच्या छोट्याशा योगदानाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. खरेच, यापेक्षा मोठे कोणतेही प्रोत्साहन असू शकत नाही.

तुमच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा, संगीताच्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या मार्गाने देशसेवा करण्याचा सदैव प्रयत्न करेन. मोदीजी, अत्यंत आदराने नतमस्तक होऊन तुमच्या चरणांना स्पर्श करून तुमचा आशिर्वाद घेते."

या गाण्याचे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी भावना व्यक्त करत म्हणाले, "आपल्या गाण्याची माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदीजींनी दखल घेणं आणि कौतुक करणं .....हा खूप खूप समाधानाचा क्षण. जय श्रीराम."

याशिवाय हे गाणं गाणारे गायक सुरेश वाडकर म्हणाले, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री राम यांना समर्पित आमचे भजन शेअर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राण-प्रतिष्ठा महोत्सवासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. जो प्रत्येकाच्या जीवनातील एक दिव्य, अविस्मरणीय आणि अद्वितीय आणि पवित्र क्षण बनेल. जय जय श्री राम! देवा सियावर रामचंद्राचा जय !"

हृदय में श्रीराम है हे गाणं संदीप खरे यांनी लिहीलं असून सलील कुलकर्णींनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांनी हे गाणं गायलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT