PM Narendra Modi shares Anupamaa video: 
मनोरंजन

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदीही 'अनुपमा'चे फॅन! व्हिडिओ शेयर करत अशाप्रकारे दिवाळी साजरी करण्याचं केलं आवाहन..

PM Narendra Modi shares Anupamaa video: टिव्ही विश्वातील लोकप्रिय मालिका 'अनुपमा'ने आपल्या प्रेक्षकांना यंदाची दिवाळी वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Vaishali Patil

PM Narendra Modi shares Anupamaa video: सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम पहायला मिळत आहे. दिवाळीला आपण नवनवीन वस्तू खरेदी करतो आणि आपल्या प्रियजनांना गिफ्टही देतो. सर्वजण आपआपल्या पद्धतीने दिवाळी साजरा करतात मात्र टिव्ही विश्वातील लोकप्रिय मालिका 'अनुपमा'ने आपल्या प्रेक्षकांना यंदाची दिवाळी वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे आवाहन केले आहे. एक व्हिडिओ शेयर करत 'व्होकल फॉर लोकल कॅम्पेन'चा प्रचार केला आहे.

या व्हिडिओमध्ये अनुपमा आणि अनुज कपाडियासोबत छोटी आणि डिंपलही दिसत आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून अनुपमा आणि अनुज डिजिटल पेमेंटसह स्थानिक गोष्टींचा प्रचार करताना दिसत आहेत.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अनुपमा' स्टार रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्होकल फॉर लोकल कॅम्पेनच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी अनुपमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून देशवासियांना खास संदेश देत दिला.

हे शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, 'व्होकल फॉर लोकलला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि लोक व्होकल गोष्टी विकत घेऊन या मोहिमेला पाठिंबा देत आहेत.'

अनुपमा आणि अनुजचा हा व्हिडिओ देशभरातील लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ज्यात ते खरेदीसाठी स्थानिक वस्तू वापरण्याबाबत बोलत आहे.

या व्हिडीओच्या शेवटी पंतप्रधान मोदींचा आवाज ऐकू येतो. त्यांनी व्होकल फॉल लोकल मोहिमेला प्रोत्साहन दिल्याबद्दल अनुपमा सिरीयल आणि स्टार प्लस चॅनलचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT