Yo Yo Honey Singh, honey singh, mumbai police  SAKAL
मनोरंजन

Yo Yo Honey Singh: अपहरणाच्या गंभीर आरोपानंतर हनी सिंगने दाखल केली आयोजकांवर तक्रार, बघा काय घडलं?

मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे

Devendra Jadhav

Yo Yo Honey Singh News: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगची कोणतीही वेगळी ओळख सांगायची गरज नाही.

हनी सिंग सध्या त्याच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम हनी सिंग ३.० मुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता यो यो हनी सिंगबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.

विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) आणि इतरांविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

आता हनी सिंगने या गंभीर गुन्ह्यानंतर आयोजकाविरुद्ध तक्रार दाखल केलीय.

(Police complaint against bollywood singer serious charge of kidnapping)

मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात शनिवारी हनी सिंग याचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला हनी सिंग उपस्थित राहून त्याने गायनही केले मात्र आयोजकाकडून हनी सिंग याला पैसे देण्यावरून कार्यक्रमाचे आयोजक आणि हनी सिंग यांच्यात वाद झाला.

या वादावादी नंतर हनी सिंग याने कार्यक्रमाच्या आयोजका विरोधात मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जावरून बीकेसी पोलीस अधिकचा तपास करत आहेत

एका इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रमन यांनी यो यो हनी सिंग आणि इतरांविरुद्ध अपहरण आणि त्याला बंदिस्त ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे, असा खुलासा मुंबई पोलीसांनी केलाय.

विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंग विरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मारहाणीसारखे गंभीर आरोपही केले आहेत.

एका प्रसिद्ध इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रवि रमण यांनी यो यो हनी सिंग विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, त्याला कैदेत ठेवून मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

विवेक रमन नावाच्या व्यक्तीने बीकेसी, मुंबईमध्ये यो यो हनी सिंगचा फेस्टिविना कार्यक्रम आयोजित केला होता.

15 एप्रिल रोजी कार्यक्रम होता, पैशाच्या व्यवहारात बिघाड झाल्याने विवेकने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

याच गोष्टीचा राग आल्याने हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी विवेकचे अपहरण केले, त्याला मुंबईतील सहार येथील हॉटेलमध्ये डांबून ठेवले, तेथे त्याला मारहाण करण्यात आली.

विवेकने त्याच्या तक्रारीत गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. अशा स्थितीत या बातमीसोबतच हनी सिंगचे नावही खूप चर्चेत आहे.

सध्या प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग त्याच्या 3.0 अल्बममुळे चर्चेत आहे. मात्र विवेक रमणने हनी सिंगवर केलेल्या या गंभीर आरोपांनंतर आता सर्वांना रॅपर हनी सिंगच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

या प्रकरणामध्ये जर काही सत्य असेल, तर प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन करणारा यो यो हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडलेला दिसतो. आता हनी सिंगने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला कोणतं वळण लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT