Police lathi charges to control the crowd who came to see Salman Khan at Galaxy Apartments watch video  
मनोरंजन

Salman Khan Birthday : भाईजानच्या चाहत्यांवर पोलिसांची 'दबंगगिरी'! सलमानचे 'हात वर', पाहा Video

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : चाहत्यांसाठी त्यांच्या आवडत्या स्टार्स बर्थडे म्हणजे एखाद्या सणापेक्षा कमी नाही.आज इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी रात्री उशिरापर्यंत सलमान खानच्या घरात आयोजित पार्टीला उपस्थित होते.

दरम्यान आज सकाळपासूनच सलमानच्या चाहत्यांनी त्याचा घरासमोर गर्दी केली होती. आता नियंत्रणाबाहेर गेलेल्या या चाहत्यांच्या गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सलमान खानचा वाढदिवसानिमित्त सलमानची बहीण आणि अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या घरी रात्री पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये संगीता बिजलानी, तब्बू, पूजा हेगडे बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

शाहरुख खानने देखील सलमानच्या घरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेला होता. दरम्यान सलमान खानचा चाहत्यांनी आज सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती. आता सलमान खानच्या घराबाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिस लोकांवर लाठीचार्ज करत आहेत.

सलमान खानच्या घराबाहेरील गर्दी नियंणाबाहेर गेल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. दरवर्षी भाईजानच्या वाढदिवशी हजारो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर येतात. काही वेळापूर्वी सलमान खानने त्याच्या घराच्या बाल्कनीत येत बाहेर जमलेल्या चाहत्यांना हात वर करून अभिवादन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT