Ponniyin Selvan 2  Sakal
मनोरंजन

Ponniyin Selvan 2 वर पब्लिक खुश! ऐश्वर्याच्या चित्रपटाची अवघ्या दोन दिवसातच बॉक्स ऑफिसवर सेंच्यूरी...

Vaishali Patil

Ponniyin Selvan 2 Box Office Collection Day 2: पोन्नियिन सेल्वन या ऐतिहासिक चित्रपटाच्या पहिला भाग बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आता त्याचप्रमाणे या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण केली आहे.

'पोनियिन सेल्वन 2' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाला प्रदर्शित अवघे दोन दिवस झाले आहेत. मणिरत्नम दिग्दर्शित या पीरियड ड्रामा चित्रपटाचा ओपनिंग डे कलेक्शन तर जबरदस्तच होते आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहे.

'पोनियिन सेल्वन 2'या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद तर दिलाच मात्र समीक्षकांच्याही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळल्या आहे.

Ponniyin Selvan 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं तर, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 32 कोटींची कमाई केली होती. तर PS2 ने दुस-या दिवशी 28. 55 कोटींच्या जवळपास व्यवसाय केला आहे, तर चित्रपटाने दोनही दिवसाचे कलेक्शन पहाता 52. 55 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

त्याच वेळी, फर्स्ट डे PS2 ने जगभरात 64.14 कोटींचे एकूण जगभर कलेक्शन केले. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार, 'पोनीयिन सेल्वन 2' ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जे या चित्रपटासाठी खुपच चांगले ओपनिंग आहे.

मल्टीस्टारर चित्रपट Ponniyin Selvan 2मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, जयराम, जयराम, एल.ए. नासार यांच्यासारख्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT