Ponniyin Selvan 2 singer Rakshita Suresh meets with car accident in Malaysia Esakal
मनोरंजन

Rakshita Suresh: ' पोन्नियिन सेल्वन'च्या गायिकेचा भीषण अपघात.. कार डिव्हायडरला धडकली, 10 सेकंदातच..

Vaishali Patil

साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका रक्षिता सुरेश हिचा मोठा अपघात झाला आहे. ' पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये गाणारी रक्षिता हिचा मलेशियामध्ये भीषण अपघात झाला. तिची कार दुभाजकाला धडकली. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ती सध्या मलेशियामध्ये असून रविवारी तिचा अपघात झाला.

(Ponniyin Selvan 2 singer Rakshita Suresh meets with car accident in Malaysia share post)

एआर रहमानसोबत 'पोन्नियिन सेल्वन 2' मधील गाण्यांला रक्षिता सुरेशने आवाज दिला आहे. त्यासंदर्भात पोस्ट शेअर करत तिने तिच्यासोबत झालेल्या अपघाताची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

त्यात तिने लिहिले की, अपघातानंतर तिचे संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर फिरू लागले. 7 मे 2023 रोजी सिंगरने पोस्टमध्ये लिहिले, “आज माझा एक मोठा अपघात झाला. मी सकाळी मलेशियातील विमानतळावर जात असताना प्रवास करत असलेली कार डिव्हायडरला धडकली आणि रस्त्याच्या कडेला पडली. त्या 10 सेकंदात माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आलं."

पुढे ती लिहिते, "एअरबॅग्जमुळे आम्ही वाचलो. नाहीतर गोष्टी आणखी बिघडू शकल्या असत्या. घडलेल्या प्रकारामुळे आम्ही घाबरलो आहोत आणि इतर सहप्रवासी सुरक्षित आहेत. सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आम्ही वाचलो."

रक्षिता सुरेशने ' पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये किरुनागे हे एक गाणे गायले आहे. रक्षिता सुरेशने 2009 मध्ये लिटिल स्टार सिंगर रिअॅलिटी शो जिंकला होता. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT