Ponniyin Selvan 2 trailer and music launch Vikram, Jayam Ravi, Aishwarya Rai supreme look
Ponniyin Selvan 2 trailer and music launch Vikram, Jayam Ravi, Aishwarya Rai supreme look sakal
मनोरंजन

Ponniyin Selvan 2 Trailer Out: अंगावर काटा आणतोय पोन्नियन सेल्वन 2 चा ट्रेलर.. एकदा पाहाच..

नीलेश अडसूळ

Ponniyin Selvan 2 trailer : गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'पोन्नियन सेल्वन-1' या चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता 'पोन्नियन सेल्वन-2' प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातला आह. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर एका अतिभव्यतेची अनुभूती प्रेक्षकांना मिळते. शिवाय सिंहासनासाठी होणाऱ्या युद्धाचे प्रसंग पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.

(Ponniyin Selvan 2 trailer and music launch Vikram, Jayam Ravi, Aishwarya Rai supreme look)

पोन्नियन सेल्वन या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 2 (Ponniyin Selvan 2)  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिनेता विक्रमचा वेगळा अंदाज समोर आला आहे.

काल, बुधवार 29 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर आउट करण्यात आला. 'पोन्नियन सेल्वन-1 मध्ये चोल शासकांचा अपूर्ण राहिलेला सूड ते पोन्नियन सेल्वन 2 मध्ये पूर्ण करणार आहेत. सिंहासनासाठी यावेळी महायुद्ध होणार आहे, असे या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आले आहे.

इतक्या दमदार ट्रेलर नंतर प्रेक्षकांना हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागली आहे. तर हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय राणी नंदिनीची भूमिका साकारत असून तिच्या रूपाची चाहत्यांना जणू भुरळच पडली आहे. आहे. तर अभिनेता चियान विक्रम, शोभिता धूलिपाला आणि जयम रवी यांनी देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी पोन्नियन सेल्वन या चित्रपटाचा पहिला भाग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. मनी रत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी 1995 मध्ये काल्कि यांनी लिहिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT