'Ponniyin Selvan': Aishwarya Rai Bachchan as Nandini Google
मनोरंजन

Ponniyin Selvan सिनेमातील ऐश्वर्याचा लूक समोर,राणी नंदिनीवर खिळल्या नजरा...

Ponniyin Selvan हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

प्रणाली मोरे

जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या(Aishwarya Rai-Bachchan) अभिनेत्री म्हणूनही तितकीच हरहुन्नर आहे. पुन्हा एकदा ती आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांना मोहवून टाकायला सज्ज झालीय. मणिरत्नम यांच्या आगामी 'पोन्निनियन सेलवन पार्ट-१' मधील ऐश्वर्याचा लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये राणीच्या थाटात दिसणाऱ्या ऐश्वर्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.('Ponniyin Selvan': Aishwarya Rai Bachchan as Nandini)

'Ponniyin Selvan': Aishwarya Rai Bachchan as Nandini

राणी नंदिनी च्या भूमिकेत ऐश्वर्या राय-बच्चन खूपच सुंदर दिसत आहे. तिला पारंपरिक पेहरावात पाहिल्यावर लोकांना एक सुखद धक्का बसला आहे. ऑरेंज रंगाची साडी,नेकपीस,झुमता,मांगटिका,आणि डोक्याला टिकली या पेहरावात ऐश्वर्या गॉर्जियस दिवा दिसत आहे. या लूक मध्ये ऐश्वर्यानं आपल्या केसांना मोकळं सोडलं आहे. तिच्या या लूकवर चाहते भलतेच भाळले आहेत. राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या खरोखरच एखाद्या साम्राज्याची राणीच वाटत आहे.

ही तर फक्त एक झलक आहे, पण प्रत्यक्ष 'पोन्नियन सेलवन' सिनेमात ऐश्वर्याचे एकापेक्षा एक गॉर्जियस लूक्स आपल्यासाठी गोड मेजवानी ठरतील हे नक्की. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या या लूकवर आपल्या चांगल्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडायला सुरुवात केली देखील. हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाला हिंदी,तामिळ,तेलुगू,मल्याळम,कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. या सिनेमातील विक्रम,कार्थीचा लूक याआधीच समोर आला आहे. या मल्टिस्टारर सिनेमात जयम रवि,शरद कुमार,विक्रम बाबू ,शोभिता धूलिपाला,प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'पोन्नियिन सेलवन' हा एक पीरियड ड्रामा आहे. हा सिनेमा कल्कि कृष्णामूर्ती यांच्या १९५५ साली आलेल्या 'पोन्नियन सेलवन' या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमाचे बजेट ५०० करोड इतके आहे. भारतातील महागड्या सिनेमांमध्ये याची गणती केली जाईल अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Israel Gaza Conflict: गाझावर पुन्हा हल्ल्याची तयारी; इस्राईलचा पवित्रा, हमासचे सक्रिय गट लक्ष्य करणार

Krishna River Flood Sangli : कृष्णा नदीचे पाणी सांगलीत घुसले, पाणी पातळी गेली ४० फुटांवर; कोयनेचा विसर्ग स्थिर, चांदोलीतून कपात

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून तब्बल 1 लाख 41 हजार 600 क्युसिक विसर्गाने पाणी भीमा नदीत केला

SCROLL FOR NEXT