Pooja Bhatt Angry Question of Alia Bhatt Daughter esakal
मनोरंजन

Pooja Bhatt Angry : 'आलिया तुझी मुलगी आहे का?' पूजा भट्टचा संताप, नेटकऱ्यांना दिलं कडक शब्दांत उत्तर!

पूजानंतर तिचे वडील महेश भट्ट देखील त्या शोमध्ये गेले होते.

युगंधर ताजणे

Pooja Bhatt Angry Question of Alia Bhatt Daughter : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट ही तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती. त्यातून ती लवकर बाहेर पडली. मात्र पूजानं त्या शोमध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळखही तयार केली होती.

पूजानंतर तिचे वडील महेश भट्ट देखील त्या शोमध्ये गेले होते. त्यांनी काही स्पर्धकांशी बातचीतही केली होती. त्यामुळे त्यांची चर्चा झाली होती. आता पूजा भट्टवर एक गंभीर आरोप करण्यात आला असून त्या आरोपावर तिनं तेवढ्याच परखडपणे उत्तरही दिले आहे. आलिया ही पूजा भट्टची मुलगी आहे असे बोलले जात आहे. त्यावर पूजाचा संताप झाला आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

सोशल मीडियावर पूजाविषयी विविध प्रकारची चर्चा होत आहे. त्यात आलियावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कधीकाळी वडील महेश भट्ट यांच्यासोबत लिप किस फोटो देणाऱ्या पूजानं तिच्या करिअरमध्ये खूप काही सहन केले आहे. त्या फोटोमुळे खूपच वाद झाला होता. त्यावर महेश भट्ट यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. पूजा जर माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी विवाह केला असता. अशाप्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

यानंतर बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट ही पूजा भट्टची मुलगी आहे असे बोलले जात आहे. त्यावर पूजाचा संताप झाला आहे. ती म्हणते, किती खालच्या पातळीवरचे हे बोलणे आहे. लोकं काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. तुम्ही जे बोलता त्याचा आमच्यावर काय परिणाम होतो हे कधी लक्षात घेणार आहात का नाही असा प्रश्न पूजानं यावेळी केला आहे.

आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे एक फॅशन झाली आहे. लोकं आता कुटूंबातील सदस्यांविषयी वाट्टेल ते बोलू लागली आहेत. त्यांना कुणाचे काहीच देणेघेणे नाही. सिद्धार्थ कनन यांनी घेतलेल्या त्या मुलाखतीमध्ये पूजा भट्टनं परखडपणे काही प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. तुम्हाला जेव्हा तुमच्या घरातील एका सदस्यावरुन प्रश्न विचारले जातात तेव्हा कसे वाटते, लोकं कसलाही विचार करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT