Bigg Boss OTT 2  esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 : 'तुला सणकन ठेवूनच देणार होते, पण...'!

पूजानं आपल्या वाटेला गेल्यास काय परिणाम होतील याची जाणीव करुन दिली आहे.

युगंधर ताजणे

Bigg Boss OTT 2 - टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या रियॅलिटी शो चा कायमच बोलबाला राहिला आहे त्या बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात सहभागी झालेले स्पर्धक, त्यांचे वाद हे प्रेक्षकांसाठी खास चर्चेचा विषय राहिला आहे. सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट आणि नवाझुद्दीन सिद्धिकीची पत्नी आलिया यांच्यातील वाद समोर आला होता.

सध्या पुन्हा एकदा पूजा भट्ट ही चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर आगपाखड करत पूजानं आपल्या वाटेला गेल्यास काय परिणाम होतील याची जाणीव करुन दिली आहे.त्यामुळे पूजा सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करते आहे. आलिया सिद्धिकीनं सुरुवातीला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी समोर आणून त्याविषयी चर्चा सुरु केली होती. त्यावरुन पूजानं तिला फटकारले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आलिया तू दरवेळी तुझ्या वैवाहिक आयुष्यात काय झाले यावरुन प्रेक्षकांना गृहीत धरु नकोस. तसेच त्यांची सहानूभुती मिळवण्याचे काम करु नकोस. अशा शब्दांत पूजानं तिचे कान टोचले होते. आता पुन्हा एकदा पूजा आणि बेबिका धुर्वे चर्चेत आल्या आहेत. त्यात पूजानं परखड शब्दांत तिचा राग व्यक्त केला आहे.

बिग बॉस ओटीटी २ मधील लेटेस्ट एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. त्यात प्रत्येक स्पर्धकाला तुम्हाला कोणत्या स्पर्धकाला नॉमिनेट करायला आवडेल असे विचारण्यात आले होते. यावेळी पूजा आणि बेबिका धुर्वे यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी सगळ्या स्पर्धकांना एक एक लॉकेट देण्यात आले होते. त्यात अभिषेक मल्हानच्या हाती असलेले लॉकेट तुटते. तेव्हा पुजानं ते लॉकेट बेबिकानं तोडलं असा आरोप केला. त्यांच्यात भांडणं होतात.

जोरदार झालेल्या या भांडणामध्ये पूजा बेबिकाला ऐकवते की, जर तू ते लॉकेट तोडले असेल तर तुला मी एक सणकन ठेऊन देणार आहे. बेबिकानं सांगितले की, माझ्याकडून चुकून ते तुटले. मी जाणीवपूर्वक ते काही तोडलेले नाही. मला तुझं नाव जियाकडून कळलं. पण तू असे काही करशील असे मला वाटले नव्हते. अशा शब्दांत पूजानं तिचा राग व्यक्त केल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT