Pooja Joshi arora actress Of Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Becomes Mother To Second Daughter SAKAL
मनोरंजन

Pooja Joshi Arora: 'ये रिश्ता क्या कहलाता' है फेम अभिनेत्री पूजा जोशी अरोरा झाली दुसऱ्यांदा झाली आई

पुजा आणि मनीष अरोरा पुन्हा एकदा आई - बाबा झाले आहेत

Devendra Jadhav

Pooja Joshi Arora Mother News: ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेत अक्षराची भाभी वर्षा या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूजा जोशी पुन्हा आई झालीय. पुजा आणि मनीष अरोरा पुन्हा एकदा आई - बाबा झाले आहेत.

11 ऑगस्टला शुक्रवारी पूजा आणि मनीष यांनी सोशल मिडीयावर ही आनंदाची बातमी शेअर केली.

(Pooja Joshi actress Of Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Becomes Mother To Second Daughter)

पूजा दुसऱ्यांदा आई झाली आहे, हे ठेवलं मुलीचं नाव

'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'ये रिश्ते है प्यार के' फेम पूजा जोशीने पोस्टमध्ये लिहिले की, 'आज देवाच्या कृपेने मी एका मुलीला जन्म दिला. कृपया आपण सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावा." लग्नानंतर 8 वर्षात पूजाच्या घरी दुसऱ्यांदा ही आनंदाची बातमी आलीय. पूजाने मुलीचे नाव 'रुहानी' ठेवले आहे.

बाळाच्या आगमनाची चाहूल

पूजा जोशीने सुरुवातीला 19 जुलै रोजी एका इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने ती दुसऱ्यांदा आई होणार असं सांगितलं होतं. या रीलमध्ये पूजा तिचा पती मनीषसह कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसली. पूजाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. तिच्या कुटुंबाने एकत्रितपणे 'लवकरच येत आहे' अशा शब्दांसह बाळाच्या आगमनाची घोषणा करणारी स्लेट ठेवली होती.'

गरोदरपणामुळे काही दिवस घेतलेला ब्रेक

पूजा जोशी आणि मनीष अरोरा यांनी 25 नोव्हेंबर 2015 ला एकमेकांशी लग्न केलं. एका कॉमन मित्राद्वारे हे दोघे एकमेकांना भेटले. पुढे मैत्री झाली ही मैत्री दोघांच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचली. पूजाने तिच्या पहिल्या गरोदरपणानंतर 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील तिच्या भूमिकेपासून काही दिवस ब्रेक घेतला. ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेमुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT