Pooja Sawant,siddhesh chavan ESAKAL
मनोरंजन

Pooja Sawant: पूजा अडकली लग्नबंधनात; नवऱ्यानं घेतला खास उखाणा, म्हणाला, “ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात..."

Pooja Sawant: पूजा आणि सिद्धेश यांनी लग्नसोहळ्यानंतर रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं. रिसेप्शनसाठी पूजा आणि सिद्धेश यांनी खास लूक केला होता.

priyanka kulkarni

Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंतचा (Pooja Sawant) धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला आहे. पूजानं सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) लग्नगाठ बांधली आहे. पूजा आणि सिद्धेश यांनी लग्नसोहळ्यानंतर रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं. रिसेप्शनसाठी पूजा आणि सिद्धेश यांनी खास लूक केला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी पापाराझींना फोटोसाठी पोज देताना सिद्धेशनं पूजासाठी खास उखाणा घेतला. त्यासोबतच पूजानं देखील उखाणा घेतला.

सिद्धेशनं घेतला उखाणा

“ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका, पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका", असा उखाणा सिद्धेशनं घेतला.

पूजाचा उखाणा

पूजाचं सिद्धेशसाठी उखाणा घेतला, “सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी”

पूजा आणि सिद्धेश यांचा लूक

रिसेप्शनसाठी पूजा आणि सिद्धेश यांनी खास लूक केला होता. पूजानं रेड कलरची साडी, मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केला होता. तर सिद्धेशनं ऑल ब्लॅक लूक केला होता.

सिद्धेशनं काही महिन्यांपूर्वी पूजाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पूजानं एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सिद्धेश हा पूजाला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसला. पूजा आणि सिद्धेशचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा देखील पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

पूजानं क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पूजानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गोंदण,पोश्टर बॉय,सतरंगी रे, आता गं बया,साटं लोटं पण सगळं खोटं,नीळकंठ मास्तर,दगडी चाळ या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT