pooja sawant lovestory with boyfriend siddhesh chavan wedding updates 
मनोरंजन

Pooja Sawant Love Story: "मला त्याचं स्थळ आलं आणि.." कशी आहे पूजा सावंतची लव्हस्टोरी?

पूजा सावंतने एका मुलाखतीत तिची लव्हस्टोरी सांगितलीय

Devendra Jadhav

Pooja Sawant Love Story: अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण आजवर अनेक सिनेमांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये अभिनय करताना पाहिलंय. इतकंच नव्हे तर पूजाने एका जाहीरातीत थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलंय.

पूजाने काहीच दिवसांपुर्वी तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला. पूजाने अचानक तिचं रिलेशनशीप उघड केल्याने सर्वांना सुखद धक्का बसला. अशातच पूजाने एका मुलाखतीत तिची बॉयफ्रेंडची भेट कशी झाली आणि ती लग्न कधी करणार? याचा खुलासा केलाय.

कशी झाली पूजाची बॉयफ्रेंडसोबत भेट?

ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत पूजाने हा खुलासा केला. झालं असं की.. पूजा सावंतच्या घरी लग्नाचा विषय सुरु होता. त्यावेळी पूजाला स्थळ आलं. तोच मुलगा म्हणजे पूजाचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाण. पूजाने पहिल्यांदा सिद्धेशचा फोटो बघितला. तेव्हा तिला तो आवडला. तेव्हा तिने स्वतःहून त्याच्याशी संपर्क साधला.

अरेंज मॅरेज असलं तरीही पूजा गेली वर्षभर सिद्धेशशी बोलत आहे. त्यामुळे अरेंज कम लव्ह मॅरेज, असं पूजा म्हणते

पूजा लग्न कधी करणार?

पूजा लग्न कधी करणार असा प्रश्न तिला मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, "सध्या तरी चव्हाण आणि सावंत कुटुंबात बोलणी सुरु आहेत. आम्ही दोघं जेव्हा comfortable असू तेव्हा आम्ही लग्नाचा निर्णय घेऊ."

पूजाचा बॉयफ्रेंड झगमगाटापासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या प्रायव्हसीचा आदर करणं, हे पूजाला तिचं कर्तव्य वाटतं.

पूजाचा आगामी सिनेमा

पूजा आगामी मुसाफिरा चित्रपटात झळकणार आहे. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळतेय. हा सिनेमा २ फेब्रुवारी २०२४ ला भेटीला येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT