pooja sawant new marathi movie musafiraa with pushkar jog bhojpuri actress smrity sinha SAKAL
मनोरंजन

Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा मुसाफिरा, या भोजपुरी अभिनेत्रीचं मराठीत पदार्पण

पुजा सावंतच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाच भोजपुरीमधील लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन विषयांवरचे सिनेमे भेटीला येत आहेत. बाईपण भारी देवा, आत्मपॅफ्लेट, वाळवी आणि काहीच दिवसात रिलीज होणारा झिम्मा 2. आता आणखी एक वेगळ्या विषयावरचा धमाकेदार सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचं नाव मुसाफिरा.

सिनेमाच्या नावापासुनच या सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. पुजा सावंत, पुष्कर जोग सिनेमात प्रमुख भुमिकेत झळकत आहेत. याशिवाय भोजपुरी सिनेमातली सुप्रसिद्ध अभिनेत्री यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे. तिचं नाव स्मृती सिन्हा. जाणून घ्या सिनेमाबद्दल.

(new marathi movie musafiraa)

'मुसाफिरा'... हा स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात 'मुसाफिरा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील प्लाझा सिनेमागृहाच्या परिसरात 'मुसाफिरा'च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले.

या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळतेय.

मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. 'मुसाफिरा' ही असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे. २ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Service : नागपूरहून एअर इंडियाची बंगळुरू विमानसेवा सुरू

Hit and Run : समृद्धी महामार्गावर हिट ॲण्ड रन; महिलेचा अपघाती मृत्यू, दोघे गंभीर जखमी, चालक फरार

Nagarparishad Election : राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु; तगडा पोलिस बंदोबस्त, यंत्रणा अलर्टवर

नवरा-नवरी बचावली ! 'विवाहानंतर देवदर्शानास निघालेल्या वाहनावर काळाचा घाला'; पाच जण जागीच ठार, दाेनजण गंभीर जखमी..

Nagpur Crime : ठिय्या मजुरांना ठेवले डांबून; हातपाय तोडण्याची धमकी, तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT