Poonam Pandey and Sam Bombay FIR esakal
मनोरंजन

Poonam Pandey and Sam Bombay : पूनम पांडेसह पती सॅम बॉम्बे विरोधात '100 कोटीं'चा मानहानीचा दावा! काय आहे प्रकरण?

कानपूर कोर्टामध्ये पूनम आणि तिचा पती सॅमच्या (Poonam Pandey and Sam Bombay) विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Poonam Pandey and Sam Bombay FIR: मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी पूनम पांडेनं एका दुर्धर आजाराचे कारण सांगून स्वताच्या मृत्युची बातमी व्हायरल केली होती. तिच्या पीआर टीमनं सोशल मीडियावर या संबंधी पोस्टही शेयर केली होती. आता या सगळ्यात पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे हे दोघे अडचणीत आल्याचे दिसत आहे.

पूनम पांडे आणि सॅम (Poonam Pandey and husband Sam Bombay) यांच्या विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हिंदूस्थान टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पूनम ही चर्चेत आली आहे. सुरुवातीला तिचे निधन झाल्याच्या बातम्या सगळीकडे व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तिनं व्हिडिओ शेयर करुन आपण कुठेही गेलो नसून जिवंत असल्याचे सांगितले होते. in legal trouble

सर्व्हिकल कॅन्सर (Cervical Cancer) सारख्या दुर्धर आजाराचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी आपण अशाप्रकारे प्रमोशन केल्याचेही पूनमनं Poonam Pandey and husband Sam Bombay Latest News) सांगितले होते. त्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात आगपाखड केली होती. यात बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील तिच्यावर नाराजी व्यक्त करत पूनमचा निषेध केला होता.

या सगळ्यात पूनम आणि तिचा पती सॅमच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यात मुंबईच्या फैजान अन्सारी यांनी कानपूर पोलीस आयुक्त (Poonam Pandey Latest News) यांच्यासह पूनम आणि सॅमच्या विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्या एफआयआयरमध्ये अन्सारी यांनी म्हटले आहे की, पूनम अन् तिच्या पतीनं केवळ लोकप्रियतेच्या नावाखाली कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा उपयोग केला आहे. त्यांनी त्या आजाराचे गांभीर्य आणि आपल्या मृत्यूची खोटी बातमी त्यांनी प्रसारित करुन लोकांची फसवणूक केली आहे.

पूनम पांडेनं तिच्या कृतीतून कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाला तडा दिला आहे. तसेच बॉलीवूडमधील सेलिब्रेटींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्नही तिनं केला आहे. यात फैजान यांनी कानपूर कोर्टात जाऊन त्या दोघांच्या विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात तातडीनं अरेस्ट वॉरंट काढण्यात यावा अशी मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT