Poonam Pandey bodyguard Reaction esakal
मनोरंजन

Poonam Pandey bodyguard Reaction : ती खरचं आजारी होती का? पूनमच्या मृत्यूनंतर बॉडीगार्ड आमिननं केला मोठा खुलासा!

पूनम पांडेच्या निधनानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Poonam Pandey Bodyguard Reaction: पूनम पांडेच्या निधनानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. वयाच्या अवघ्या ३२ (Poonam Pandey Death) व्या वर्षी पूनमचा मृत्यू झाल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पूनमच्या पीआर टीमनं इंस्टावर पोस्ट (Poonam Pandey Latest Marathi Nerws)N शेयर करत त्यात गर्भाशयाच्या कॅन्सरनं तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यावरुन सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

टीव्ही मनोरंजन क्षेत्रात आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे पूनम ही नेहमीच चर्चेत राहिली. तिनं तिच्या वक्तव्यानं लोकप्रियता मिळवून आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये सहभागी झालेल्या पूनमच्या निधनानं मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अशात आता तिच्या बॉडीगार्डनं जो खुलासा केला आहे त्यामुळे पूनमच्या निधनाविषयीच्या बातम्यांविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

काय म्हणाला पूनमचा बॉडीगार्ड? (Amin Khan Poonam's bodyguard)

गेल्या अकरा वर्षांपासून पूनमचा बॉडीगार्ड असणाऱ्या आमिन खाननं आता पूनमच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. ई टाईम्सनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. आमिन खाननं ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, पूनमची बहीण माझ्या कोणत्याही मेसेजला रिप्लाय देत नाही. मला तर तिच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाही. मी सातत्यानं पूनमच्या बहिणीशी संपर्क साधतो आहे मात्र मला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही.

मलाही पूनमच्या निधनाची बातमी माध्यमांमधूनच समजली. माझ्या माहितीप्रमाणे पूनमची प्रकृती चांगली होती. ती आजारी असण्याची कोणतीही चिन्हं तिच्याकडे पाहिल्यावर दिसत नव्हती. ती नेहमीच तिच्या तब्येतीची काळजी घेत होती. तिनं कधीही तिच्या आजाराविषयी कोणतीही माहिती शेयर केली नाही. आणि मलाही तिला एवढा गंभीर आजार असेल याविषयी कोणतीही लक्षणं तिच्यात दिसून आली नाही.

मी अजूनही पूनमच्या बहिणीच्या उत्तराची वाट पाहतो आहे. मला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे की, नेमकं झालं तरी काय, पूनमचा पर्सनल ट्रेनरही होता. त्यामुळे ती तिच्या तब्येती बाबत नेहमीच जागरुक असल्याचे दिसून आले. तिनं काही दिवसांपासून मद्यपान देखील बंद केले होते. काही दिवसांपूर्वी मी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा ती आजारी असल्याचे वाटले नाही. अशा शब्दांत आमिननं पूनमविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकलचा खोळंबा, प्रवाशांचा संताप! मुंबईकडे जाणारी ट्रेन ४० मिनिटं लेट, बदलापूर स्टेशनवर उसळली गर्दी

अहिल्यानगर हादरलं! 'अपहरणानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार'; युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवलं, ती रडत हाेती अन्..

Kolhapur Politics : पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक, माजी जिल्हा परिषद सदस्याचा बीपी झाला लो अन्...

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT