Poonam Pandey Death Last Interview : टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या व्हिडिओ आणि फोटोंमधून (Poonam Pandey Death) दिसणारी पूनम एकाएकी सगळ्यांना सोडून गेल्याच्या बातमीनं अनेकांना प्रश्नात पाडले आहे. अशात तिच्या एका (Poonam Pandey Latest News) व्हायरल व्हिडिओनं एक मोठी बातमी समोर आली आहे.
सध्या पूनमच्या निधनानंतर सोशल मीडियावर नेटकरी आणि फॅन्स यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी पूनमचे निधन यावर विश्वास बसत नाही. ती (Poonam Pandey Last Interview) प्रसिद्धीसाठी काहीही करु शकते. अशा प्रकारचा अंदाज लावून तिच्याविषयी मतं नोंदवली आहे. मात्र तिच्या त्या व्हिडिओनं ती जे बोलली तसं झालं तर नाही ना...असेही बोलले जात आहे.
वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी पूनमनं अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या व्हायरल झालेल्या इंस्टा पोस्टनुसार तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे सांगण्यात आले होते. रियॅलिटी शो, पुरस्कार सोहळे आणि चित्रपट यामधून पूनमनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनेक सेलिब्रेटींनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पूनमच्या मुलाखतीचा तो शेवटचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये तिनं तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगितलं आहे. त्यावेळी ती म्हणते मी तुम्हाला मोठं सरप्राईज देणार आहे.
इंस्टंट बॉलीवूडनं तो व्हिडिओ व्हायरल केला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्या व्हिडिओमध्ये पूनम म्हणते की, येत्या काही दिवसांत तुम्हाला मोठी बातमी मिळणार आहे. ते तुमच्यासाठी मोठं सरप्राईज असणार आहे. तुम्हाला सरप्राईज देणं हे मला खूपच आवडतं.
पूनमच्या त्या प्रतिक्रियेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तिच्या टीमच्या वतीनं तिचं निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला तुम्हाला ही गोष्ट सांगण्यात अतिशय वाईट वाटते की, गर्भाशयाच्या कॅन्सरनं पूनमचे निधन झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.