Poonam Pandey And Urfi Javed Poonam Pandey And Urfi Javed
मनोरंजन

Poonam Pandey: "मी मेले नाही, फक्त..."; उर्फी जावेदनं उडवली पूनम पांडेची खिल्ली

Poonam Pandey: उर्फी जावेदनं (Urfi Javed) देखील नाव न घेता पूनमची खिल्ली उडवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही सध्या तिच्या निधनाच्या बातमीच्या स्टंटमुळे चर्चेत आहे. पूनमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या निधनाची बातमी पोस्ट करण्यात आली. नंतर पूनमनं एक व्हिडीओ शेअर करुन ती जिवंत असल्याचं सांगितलं. कॅन्सरबाबत जागरुकता पसरवण्यासाठी निधनाची बातमी पसरवण्यात आली होती, असं पूनमनं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. आता अनेक सेलिब्रिटींनी पूनमला ट्रोल केलं आहे. अशताच आता अभिनेत्री उर्फी जावेदनं (Urfi Javed) देखील पूनमचं नाव न घेता पूनमची खिल्ली उडवली आहे.

उर्फी जावेदची पोस्ट

उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्फी ही झोपेतून उठलेली दिसत आहे. या फोटोला उर्फीनं कॅप्शन दिलं, "नमस्कार मित्रांनो, मी मेले नाही, फक्त हँगओव्हरबद्दल जागरूकता पसरवत आहे. जेव्हा तुम्ही मद्यपान करता तेव्हा तुम्हाला खूप जिवंत वाटते, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेल्यासारखे वाटते पण तुम्ही खरोखर मरत नाही. माफ करा मेलेले कधी मरत नाहीत." उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी उर्फीच्या फोटोला मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

पूनम पांडे व्हिडीओ शेअर करुन म्हणाली, "मी जिवंत आहे"

पूनम पांडेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, "तुम्हाला सर्वांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे - मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपला जीव गमवावा लागतो. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील बरा होणारा आहे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवूयात"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT