Manisha Koirala Had Faked Her Death esakal
मनोरंजन

Poonam Pandey Fake Death News: पूनम पांडेपूर्वी बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रीबाबत पसरवली गेली निधनाची बातमी!

पूनमच्या अशा वागण्याचा आणि प्रँक करण्याचा चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी (Poonam Pandey Faked Death News) निषेध केला. तिच्यावर आगपाखड करत टीका केली.

युगंधर ताजणे

Manisha Koirala Had Faked Her Death: मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी पूनम पांडेची काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी व्हायरल झाली (Poonam Pandey Latest News) होती. तिच्या निधनाची बातमी पीआर टीमनं इंस्टावर शेयर केली होती. त्यावर आता पूनमनं एक व्हिडिओ शेयर करुन आपण जिवंत असल्याचे सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.

पूनमच्या अशा वागण्याचा आणि प्रँक करण्याचा चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी (Poonam Pandey Faked Death News) निषेध केला. तिच्यावर आगपाखड करत टीका केली. कित्येक बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील त्यावरुन तिला चांगलेच सुनावले. पूनमनं माफी मागत आपण हे सारं त्या सर्व्हिकल कॅन्सर सारख्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी असे प्रमोशन केले. असे सांगितले. मात्र नेटकऱ्यांनी पूनमला धारेवर धरले.

सध्या सोशल मीडियावर आणखी बातमी व्हायरल होताना दिसत आहे ती म्हणजे अशा प्रकारचा प्रँक आणखी एका बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत झाला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यावेळी तिच्यावर चाहत्यांनी प्रचंड टीकाही केली होती असे सांगितले जाते. टाईम्स नाऊनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रीनं भलेही आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली असेल मात्र तिनं स्वताच्या निधनाची बातमी देत अनेकांचा राग ओढून घेतला होता. ती अभिनेत्री आहे मनिषा कोईराला. ९० च्या दशकांत (Manisha Koirala Fake Death) आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं मनिषानं चाहत्यांना जिंकून घेतले होते. ती ९० च्या दशकांतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून लोकप्रिय होती.

नेमकं काय घडलं होतं?

आयएमडीबीच्या एका रिपोर्टनुसार १९९४ मध्ये मनिषाचा क्रिमिनल नावाचा चित्रपट आला होता. प्रसिद्ध फिल्ममेकर महेश भट्ट यांनी त्या चित्रपटाचे ज्या प्रकारे प्रमोशन केले त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्यांनी त्यावेळी पेपरमध्ये मनिषाचे निधन अशी बातमी छापण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. महेश यांना वाटले होते की, त्यांना अशाप्रकारे प्रचंड प्रसिद्धी मिळेल आणि त्याचा फायदा चित्रपटाला होईल. मात्र त्यांच्यावर खूप टीका झाली होती.

फिल्म इंडस्ट्रीला बसला होता मोठा धक्का...

महेश भट्ट यांनी जेव्हा माध्यमांना मनिषाच्या निधनाची बातमी दिली होती तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. कित्येक सेलिब्रेटींनी यावरुन नाराजी व्यक्त केली. बातमी छापून आली म्हटल्यावर कित्येकांनी त्यावर विश्वास ठेवला होता. प्रत्यक्षात अभिनेत्रीला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. असं बोललं जातं.

क्रिमिनलचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. त्याची निर्मिता मुकेश भट्ट यांनी केली होती. प्रेक्षकांनी काही करुन आपला चित्रपट पाहावा म्हणून अशा प्रकारचे प्रमोशन करण्यात आले होते. असे सांगण्यात येते. एवढं करुनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्याला प्रेक्षकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT