Poonam Pandey 
मनोरंजन

Poonam Pandey: "ती जिवंत आहे तेच माझ्यासाठी..."; पूनम पांडेच्या नवऱ्याची मोठी प्रतिक्रिया

Poonam Pandey: पूनमच्या या सर्व स्टंटबाबत आता तिच्या नवऱ्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Poonam Pandey: पूनम पांडे (Poonam Pandey) ही सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. गर्भाशयाच्या कर्करोगानं पूनमचा मृत्यू झाला, अशी पोस्ट शेअर करण्यात आली होती. ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर अनेकांनी पोस्ट शेअर करुन पूनमला श्रद्धांजली देखील वाहिली. पण नंतर पूनमनं ती जिवंत असल्याचं सांगितलं. पूनमच्या या सर्व स्टंटबाबत आता तिच्या नवऱ्यानं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

काय म्हणाला पूनमचा पती?

पूनमचा घटस्फोट झाला आहे, असं म्हटलं जात होतं पण आता हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनमचा पती सॅम बॉम्बेने स्पष्ट केले की, त्याने आणि पूनमने घटस्फोट घेतलेला नाही. पूनमच्या स्टंटबाबत सॅमला मुलाखतीत विचारण्यात आलं. "तुला पूनमच्या स्टंटबाबत आश्चर्य वाटले का?" असा प्रश्न सॅमला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाचं पूनमनं उत्तर दिलं, “नाही. तिने हे केले याचा मला आनंद आहे. ती जिवंत आहे तेच माझ्यासाठी पुरेसे आहे.”

सॅम म्हणतो, "ती सर्वात धाडसी भारतीय महिला आहे"

सॅमनं पुढे सांगितलं, "जर कोणी एखाद्या समस्येबद्दल जागरुकता निर्माण करत असेल तर त्याचा आदर करूया. पूनम पांडे टाइमलेस आहे. ती सर्वात धाडसी भारतीय महिला आहे."

पूनमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती पोस्ट

पूनमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं,"आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आमची लाडकी पूनम हिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने गमावले आहे.” या पोस्टनंतर अनेकांना धक्का बसला होता. पण नंतर पूनमनं एक व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, ती जिवंत आहे.

जाणून घ्या पूनम पांडेबद्दल

2013 मध्ये रिलीज झालेल्या नशा या चित्रपटामधून पूनमनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं भोजपुरी,तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केलं. पूनम ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT