Poonam Pandey 
मनोरंजन

Poonam Pandey: पूनम पांडेला सरकार देणार मोठी जबाबदारी? आरोग्य मंत्रालयाशी सुरुये चर्चा

Poonam Pandey: पूनम पांडेला केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठी जबाबदारी देऊ शकते. याबाबत पूनमची टीम आणि आरोग्य मंत्रालय यांच्यात चर्चा सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या स्टंटमुळे चर्चेत आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये पूनमचं गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याने निधन झालं आहे, असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर पूनमनं स्वत: चा एक व्हिडीओ शेअर करुन ती जिवंत असल्याचं सांगितलं. या सर्व प्रकरणानंतर पूनमचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल केलं. आता पूनम पांडेला केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठी जबाबदारी देऊ शकते. याबाबत पूनमची टीम आणि आरोग्य मंत्रालय यांच्यात चर्चा सुरु आहे.

पूनम पांडेला मिळणार मोठी जबाबदारी?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगामुळे निधन झाल्याची अफवा पसरवणारी पूनम पांडे हिची नियुक्ती सरकारच्या कर्करोगच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पूनम पांडेची टीम आणि आरोग्य मंत्रालया यांच्यात या संदर्भात चर्चा सुरु आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने निधन झाल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडवून देणारी पूनम पांडे जीवित असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी हा मार्ग स्वीकारला होता, असं पूनमनं सांगितलं होतं.

जाणून घ्या पूनम पांडेबद्दल

पूनम पांडे ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2013 मध्ये नशा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिनं अनेक मालिका आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT