Monica Bedi  Sakal
मनोरंजन

Birthday Special: अबू सालेमशी कसे होते मोनिका बेदीचे कनेक्शन, कशी पोहोचली बॉलिवूड अभिनेत्री अंडरवर्ल्डमध्ये?

अशीच गोष्ट मोनिका बेदीची आहे, जी अबू सालेमच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की ती चांगल्या वाईट गोष्टी सगळं विसरून गेली होती.

सकाळ डिजिटल टीम

प्रेम आणि फसवणूक प्रत्येक प्रेमकथेत बघायला मिळते, परंतु लव्ह स्टोरीज खास असतात, जिथे प्रेम, रोमान्स, ग्लॅमर याशिवाय जेल आणि मृत्यूचा रक्तरंजित खेळ देखील आहे. अशीच गोष्ट मोनिका बेदीची आहे, जी अबू सालेमच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की ती चांगल्या वाईट गोष्टी सगळं विसरून गेली होती. करिअर पण पणाला लावलं होतं.

दुबईतील एका हॉटेलमध्ये एक मोठा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला अनेक हाय प्रोफाईल लोकांनी हजेरी लावली होती. त्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमही होता. अनेक सुंदर मुली, ग्लॅमर, पार्टी सगळं काही होते पण डॉनची नजर सुंदर बॉलिवूड दिवा मोनिका बेदीवर खिळली. अबू पहिल्याच नजरेत मोनिकाच्या प्रेमात पडला होता. या पहिल्याच भेटीत मोनिका आणि अबू सालेम एकमेकांना आवडू लागले. त्यानंतर ते सतत भेटू लागले.

मोनिका बेदी भारतात परत आली होती, पण तिने आपले हृदय डॉनला दिले होते. त्या दिवसांत मोनिकाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेऊन काही वर्ष झाली होती. या अभिनेत्रीने 1995 मध्ये 'सुरक्षा' या डेब्यू चित्रपटातून सर्वांची मनं जिंकली होती. बॉलिवूडचे इतर अनेक प्रोजेक्टही मोनिकाच्या हातात आले.

त्याचवेळी अबू सालेमचे प्रेमही मोनिकाच्या मनात घर करू लागले. दोघेही फोनवर तासनतास बोलत असायचे. मोनिकाने अबूला सर्व काही सांगायला सुरुवात केली, पण मोनिकाला अबू डॉन आहे हे तिला माहीत नव्हते.

अबू सालेमवर कायदा कडक होऊ लागला आणि डॉनला दुबई सोडून अमेरिकेला जावे लागले. अबू सालेम बराच काळ अमेरिकेत राहिला आणि त्याने आपल्या गर्लफ्रेंडलाही तिथे बोलावले. बॉलीवूड सोडून मोनिका बेदीही आपल्या प्रेमासाठी अमेरिकेत राहू लागली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी अमेरिकेतच लग्न केले. मोनिका अबूसोबत राहत होती. अबू सालेम मोनिकाचे खूप रक्षण करत होता, तर बॉलिवूड दिवा मोनिकाही डॉनसाठी काहीही करायला तयार होती. त्याच वेळी, त्यांचे नाते जगभर प्रसिद्ध झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT