popular musician sajid khan says adopted wajid as my surname i dont want people to call me 
मनोरंजन

'दोस्तीसाठी कायपण',मित्राच्याच नावानं ओळखलं जावं अशी इच्छा 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - दोस्तीची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यावरुन बॉलीवूडमध्ये मोठ्या संख्येनं काही चित्रपटही आले आहेत. प्रेक्षकांची त्याला चांगली पसंतीही त्याला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संगीत क्षेत्रातील एका मान्यवर व्यक्तीचे निधन झाले. त्याचे नाव वाजिद खान, वयाच्या 43 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. साजिद आणि वाजिद यांच्या नावानं वेगवेगळ्या संगीतरचना कमालीच्या लोकप्रिय झाल्या आहेत. आपला मित्र आता नसल्यानं त्याची खंत साजिद यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्याचं जाणं आपल्याला कमालीचं वेदना देऊन गेलं. या दोन संगीतकारांची मैत्री सर्वांना परिचित आहे. त्याविषयी साजिद यांनी नुकतेच भाष्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साजिद यांनी काही आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणाले की, “लोकांनी मला साजिद खान म्हणावे अशी माझी इच्छा नाही, म्हणूनच मी वाजिदला माझ्या नावापुढे आडनाव म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. माझे नाव साजिद वाजिद आहे आणि शेवटपर्यंत राहील. मला नेहमीच वाजिद माझ्या आजूबाजूला असल्यासारखे वाटते. मी म्युजिक कंपोज करायला सुरूवात केली आहे, परंतु मी असे कधी करेन असे मला वाटले नव्हते. आज जे काही आहे त्याचे श्रेय त्याचे आहे.  साजिद-वाजिद यांची जोडी संगीतविश्वामध्ये प्रसिध्द आहे. त्यातील एक संगीतकार वाजिद यांचे निधन झाले आहे. त्या धक्क्यातून साजिद हे काही पूर्णपणे सावरलेले नाहीत.  मागच्या वर्षी वाजिद खान यांचे निधन झाले.

याबाबत अधिक सविस्तरपणे बोलताना साजिद म्हणाला की,  पैसा, पावर आणि करिअरला खूप महत्त्व दिले जाते. भाऊ-बहीण एकमेकांना भेटतही नाहीत. मुलं त्यांच्या वृध्द आई-वडीलांची काळजी देखील नाही करतं. पण, आम्ही असे नाही आहोत. आम्ही एकमेकांशी खूप जोडलेले आहोत.  मला वाटतं की त्यावेळी वाजिद माझ्यासोबत असतो. आम्ही तीन भाऊ होतो. वाजिद, जावेद आणि मी. जेव्हा आमचे वडील ठीक नव्हते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले होते की तुमच्यामध्ये काहीही येऊ देऊ नका. त्यांना आमच्या तिनही भावडांचं एक उदाहरण द्यायचे होते.

वाजिद आणि मी खूप जवळ होतो. आयसीयूमध्ये मी त्याला पीपीई किट परिधान करून भेटलो. तेव्हा एक अशी वेळ आली की मला वाटले की मी जायला हवे होते. तो गेल्या पासून  रिकामा वेळ भरून काढणे कठीण झाले आहे. मी जेव्हा त्याला गमावले तेव्हा मी सलमानला सांगितले की माझ्याकडून आता काही होईल किंवा काही करण्याची ताकद माझ्यात राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीत मला त्यांनीच आधार दिला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT