Dhanush Viral Video: Esakal
मनोरंजन

Dhanush Viral Video: आपल्या लग्नाला धनुष आल्याचे कळताच असिस्टंटला रडू आवरेना

Vaishali Patil

साऊथ सुपरस्टार धनुष हा नेहमी चर्चेत असतो. साऊथ सिनेमाचा सुपरस्टार धनुषनं बॉलीवूडमध्येही काही सिनेमे केले आहेत. धनुष त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असतोच. मात्र आता तो पुन्हा त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत आला आहे.

सध्या धनुषचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात धनुषने रविवारी अचानक असिस्टंटच्या लग्नाला हजेरी लावली. धनुषने अचानक लग्न सोहळ्याला हजेरी लावल्याने सर्वांनाच धक्का बसला.

धनुषसारख्या मोठ्या स्टारला आपल्या लग्नात पाहिल्यानंतर असिस्टंट खुपच भावुक झालेला दिसला. यावेळी धनुषच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने अगदी साधा लूक कॅरी केला होता. तो शर्ट, जीन्स आणि कॅप घालून लग्नात उपस्थीत होता.

चित्रपटाच्या शुटिंगमधून वेळ काढत आपल्या कर्मचाऱ्याच्या लग्नाला धनुष गेला आणि त्याने नवविवाहित जोडप्यासोबत फोटोही काढले. धनुषचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी धनुषला पाहिल्यानंतर असिस्टंटला देखील रडू आवरले नाही.

धनुषच्या व्हिडिओ त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये धनुष त्याच्या असिस्टंटसोबत पोझ देत आहे. यात धनुषसोबत असुरन चित्रपटाचा सहअभिनेता केन करुणस देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या साध्या लूकचं खुप कौतुक आहे.

धनुषच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं तर तो त्याच्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी चाहते खुप उत्सूक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे.

या चित्रपटाच्या कलाकारांबाबत बोलायचं झालं तर यात धनुषसोबत या चित्रपटात प्रियंका अरुल मोहन, शिवा राजकुमार, निवेदिता सतीश आणि संदीप किशन मुख्य भूमिका आहेत. यासोबतच धनुष आनंद एल राय च्या 'तेरे इश्क में' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT