Evelyn Sharma Post Breastfeeding Photo Google
मनोरंजन

अभिनेत्रीचा ब्रेस्टफीडिंग करतानाचा फोटो चुकून झाला पोस्ट?

'ये जवानी है दिवानी' मधील एवलिन शर्मा हिला नुकताच कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.

प्रणाली मोरे

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी पुरेपूर वापर करून घेतात. त्याबरोबरीनेच ते फॅन फॉलॉइंग टिकून रहावं,चाहत्यांमध्ये आपली इमेज चांगली रहावी किंवा आपल्याच नावाचा बोलबाला रहावा यासाठी वैयक्तिक आयुष्यातल्याही अनेक गोष्टी पोस्टच्या माध्यमातून शेअर करीत असतात. वेगवेगळे ग्लॅमरस फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यात अग्रेसर असतात. पण यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. काही सेलिब्रिटी असं ट्रोलिंग मनावर घेतात तर काही 'जाने दो' म्हणत दुर्लक्ष करतात. 'ये जवानी,है दिवानी' या सिनेमात रणबीर कपूर जिच्यावर लट्टू झालेला दिसला ती अभिनेत्री एवलिन शर्मावरही आता तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय. तो फोटो पुढे बातमीत आम्ही जोडला आहे. त्याविषयी सविस्तर वाचा. (Evelyn Sharma Post Breastfeeding Photo)

अभिनेत्री एवलिन शर्मानं(Evelyn Sharma) तुषार भिंडीशी लग्न केल्यानंतर बॉलीवूडपासनं दूर राहणं पसंत केलं. त्यातच तिनं गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. आज ती आपल्या मुलीसोबत घरी मातृत्वाचा आनंद घेत आहे. पण याच आनंदाच्या भरात जाणुनबुजून म्हणा किंवा चुकून म्हणा तिनं अशी गोष्ट केलीय की सोशल मीडियावर तिच्या त्या पोस्टवर जेवढ्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत तितकंच तिला ट्रोलही केलं गेलंय. तिनं आपल्या तीन महिन्याच्या मुलीला ब्रेस्टफीडिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला अनं काही तासातच तो फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत एवलिन खूप खुश दिसत आहे. ती तिचं मातृत्व मनापासुन एन्जॉय करतेय हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. या फोटोवर काही चाहते म्हणाले आहेत,''सगळ्यात आनंदाचा क्षण'' तर काही ट्रोलर्सनी म्हटलंय,''एवढी वैयक्तिक गोष्ट सोशल करायची काहीच गरज नव्हती''. सुरुवातीला हा फोटो चुकून पोस्ट झाल्यासारखं वाटलं पण एवलिन शर्माचं फोटो कॅप्शन वाचून खात्री पटली की तिनंच तो स्वतःहून पोस्ट केला आहे. असो,पण एखादी अभिनेत्री जेव्हा आपल्या फीगरचा विचार न करता पूर्णपणे मातृत्वाचा आनंद घेताना दिसते तेव्हा त्यातूनही अनेकांना धडा मिळतो हे तितकच खरं आहे. त्यामुळे एवलिननं हा पोस्ट करून एकप्रकारे समाजप्रबोधनच केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT