Post Office Ughad Aahe new comedy serial starting from 5 January on sony marathi  sakal
मनोरंजन

Marathi Serial: खळखळून हसण्याची नवी संधी! कारण, 'पोस्ट ऑफीस उघडं आहे..'

हास्यजत्रेचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची नवी मालिका उद्यापासून /प्रेक्षकांच्या भेटीला..

नीलेश अडसूळ

Post Office Ughad Aahe: सोनी मराठी वाहिनी एक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांचे आवडते हास्यवीर या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. नेहमी निरनिराळ्या स्किट्समधून आपल्याला हसायला भाग पडणारे हास्यवीर आता या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येताहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

(Post Office Ughad Aahe new comedy serial starting from 5 January on sony marathi)

प्रेक्षकांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे हेसुद्धा 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेतून मालिकेत छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. सोबतच हास्यवीर समीर चौघुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम, पृथ्वीक प्रताप, ईशा डे, वनिता खरात, ओम्कार राऊत, शिवाली परब, संदेश उपश्याम, दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने हे कलाकारही या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत.

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका भूतकाळातील गोड आठवणींना उजाळा देणारी मालिका आहे. पारगाव नावाच्या एका गावात पोस्ट ऑफीस आहे. या पोस्टात काम करणारी मंडळी, त्यांचा रोजचा दिवस, त्यात तिथे घडणाऱ्या घटना यांभोवती ही मालिका आणि तिची गोष्ट फिरते. त्याशिवाय या मंडळींच्या घरची गोष्टही आपल्याला पाहायला मिळेल.

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आजवर त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पडलं आहे. आता 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या त्यांच्या पहिल्या मालिकेद्वारे ते हास्याचा धमाका घेऊन येताहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT