poster release of marathi movie ekda kay zala directed by Salil Kulkarni 
मनोरंजन

सलील कुलकर्णींच्या 'एकदा काय झालं...'चे पोस्टर रिलीज

सकाळ वृत्तसेवा

‘वेडिंगचा शिनेमा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या मध्यामातून दिग्दर्शनात पदार्पण करणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी रसिक प्रेक्षक आणि चाहत्यांबरोबर आणखी एक गुपित शेअर केले आहे. सलील कुलकर्णी यांनी त्यांचा दुसरा मराठी चित्रपट ‘एकदा काय झालं’चे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’ने भारतात आणि परदेशांतसुद्धा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला. या निखळ विनोदी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला झाला आणि रूढार्थाने सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले. हे यश ताजे असतानाच ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकले आणि रसिकांची उत्सुकता पुन्हा एकदा जागृत झाली आहे.

गजवदन प्रॉडक्शन्स आणि शो बॉक्स एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी‘एकदा काय झालं’मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार असून २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’चे कौतुक झाले. मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, शिवराज वायचळ , ऋचा इनामदार या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे होते. या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केल्याची प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांमध्ये उमटली होती. त्यामुळेच ‘एकदा काय झालं’बद्दलही रसिकांमध्ये आत्ताच उत्कंठा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT