Aryan Khan Sakal
मनोरंजन

''आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची डील'', धक्कादायक व्हिडिओ आला समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आर्यन खान ड्रग्स (aryan khan drugs case) प्रकरणातील एक साक्षीदार किरण गोसावीच्या सहकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer samir wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांमध्ये डील केल्याचा आरोप केला आहे.

प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असल्याचे सांगतोय. तो म्हणतो, ''क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी तो किरण गोसावीसोबत होता. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिलं. एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी किरण गोसावी आणि सॅम नावाची व्यक्ती भेटली. हे प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटी रुपयांमध्ये डील झाली होती. त्यापैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडे सरांना द्यायचे आहे आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी फोनवर बोलत होते. निळ्या मर्सिडीज कार मध्ये त्याची बोलणी झाली. त्यानंतर किरण गोसावींनी एका ठिकाणाहून मला ५० लाख रुपये घ्यायला पाठविले होते. ते पैसे मी त्यांना आणून दिले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक पिशवी देऊन ती सॅमला द्यायला सांगितली होती. त्यानंतर किरण गोसावी स्वतः पत्नीसोबत बाहेर गेले होते.'' असे खळबळजनक आरोप या व्हिडिओमधून केले आहेत. मात्र, सकाळ या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

''किरण गोसावी 27 सप्टेंबरला अहमदाबादला गेला होता. तेथून येऊन तो मुंबईत NCB अधिकाऱ्यांना भेटला. गोसावीने सॅम नावाच्या व्यक्तीला 38 लाख देण्यास बॉडीगार्ड प्रभाकरला सांगितले होते. त्या दिवसानंतर गोसावी गायब असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती'' प्रभाकरने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT