Prabhas Google
मनोरंजन

'आदिपुरुष' मध्ये प्रभासचा 'राम अवतार'; दिग्दर्शकाची 'रामनवमी'ला खास पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' सिनेमात प्रभासचा लूक काय असेल यावरनं चाहते वेगवेगेळे अंदाज लावत आहेत,त्यात 'राम अवतारा'ला विशेष पसंती मिळतेय.

प्रणाली मोरे

दक्षिणेकडचा सुपरस्टार अभिनेता प्रभासचा(Prabhas) बहुचर्चित सिनेमा 'आदिपुरुष' गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. या सिनेमात प्रभास एका वेगळ्याच व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. बोललं जातंय की 'आदिपुरुष' सिनेमात प्रभास रामाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते नेहमीच त्याच्या सिनेमातील व्यक्तीरेखेचे रोज वेगवेगळे अंदाज बांधत फोटोशॉप्ड केलेले त्याचे वेगवेगळे फोटो शेअर करीत असतात,जी व्हायरल होताना दिसतात.

गेल्या काही दिवसांपासून अफवा होती की रामनवमीचं(Ramnavmi) औचित्य साधत सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत(Om Raut) 'आदिपुरुष' सिनेमाचा फर्स्ट लूक किंवा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करेल. पण आता ओम राऊतने सोशल मीडियावर रामनवमीच्या निमित्तानं सिनेमाशी संबंधित एक व्हिडीओे शेअर केला आहे. 'आदिपुरुष' सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत नेहमीच सिनेमाशी संबंधित माहिती,फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्यानं रामनवमी निमित्तानं एका खास व्हिडीओ शेअर केला आहे,ज्याची चर्चा होत आहे.

यामध्ये सिनेमाशी संबंधित प्रभासचे वेगवेगळे लूक पहायला मिळाले आहेत. या व्हिडीओला शेअर करताना ओम राऊतनं ट्वीट केलं आहे की,उफनता वीरता का सागर,छलकली वात्सल्य की गागर| ज्नम हुआ प्रभू श्री राम का, झूमे नाचे हर जन का नगर| सोशल मीडियावर ओम राऊतनं हे ट्वीट आणि चाहत्यांनी सिनेमासंबंधित बनवलेलं पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रभासच्या चाहत्यांनी ओम राऊतनं पोस्ट केलेल्या व्हिडीओला भरभरुन पसंती दिली आहे. त्याचबरोबर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. 'आदिपुरुष' प्रभासचा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमात प्रभाससोबत सैफ अली खान(Saif Ali Khan),अभिनेत्री कृति सनन(Kriti Sanan) असे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. खरंतर याआधी 'आदिपुरुष' याचवर्षी प्रदर्शित होणार होता. पण आमिर खानचा बहुचर्चित 'लाल सिंग चड्ढा' त्याच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळं आणि आमिरनं खास विनवणी केल्यामुळे आता 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलल्याचं कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT