Kalki 2898 AD Nag Ashwin opens up on his Prabhas starrer Kalki 2898 AD SAKAL
मनोरंजन

सालार सुपरहिट होताच प्रभासचा भाव वाढला! Kalki 2898 AD साठी घेतलं सर्वाधिक मानधन

600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटात कोण कोणते कलाकार आहेत आणि त्यांनी किती मानधन घेतले याबाबत जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Vaishali Patil

Kalki 2898 AD Cast Fee: साउथ स्टार प्रभास सध्या त्याच्या सालार चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा सालार चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 90 कोटींहून अधिक कमाई करून 2023 मधील सर्वात मोठा ओपनर दिला. हा चित्रपट लवकरच 500 कोटींच्या घरात पोहचले अशी आशा आहे. तर आता दुसरीकडे प्रभास त्याच्या पुढच्या सिनेमामुळे चर्चेत आला आहे.

तो सिनेमा म्हणजे नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असणार आहे ज्यात प्रभास मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बऱ्याच वेळा बदलण्यात आली होत. तर आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज होणार आहे. हा एक पौराणिक सायन्स फिक्शन चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. ज्यात VFX जोरदार असणार आहे.

600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटात कोण कोणते कलाकार आहेत आणि त्यांनी किती मानधन घेतले याबाबत जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

प्रभास

'कल्कि 2898 एडी' मध्ये प्रभासची भुमिका भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीपासून प्रेरित असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात प्रभासचा वेगळाच अवतार चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रभासचे चाहते खुप उत्सुक आहेत.

रिपोर्ट्सनुसार, प्रभासने या चित्रपटात काम करण्यासाठी 100 कोटी रुपये फी घेतली आहे. त्यासोबत या चित्रपटाच्या कमाईत त्याने भागीदारीही घेतल्याचीही चर्चा आहे.

दीपिका पदुकोण

'कल्कि 2898 एडी' चित्रपटात पहिल्यांदाच प्रभाससोबत दीपिका पदुकोणची जोडी दिसणार आहे. तर दीपिकाने या चित्रपटात काम करण्यासाठी 20 कोटी रुपये घेतले आहे.

अमिताभ बच्चन

प्रभास अन् दीपिकासोबत या चित्रपटात अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यांनी या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूकही समोर आला आहे.

अमिताभ यांचा प्रभाससोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे तर दीपिकासोबतचा दुसरा सिनेमा आहे.

कमल हासन

साउख स्टार कमल हासनही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ते प्रभासला टक्कर देणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी कमल हासन यांनी15 कोटी रुपये घेतले आहे.

तर इतर कलाकारांच्या फि बाबत बोलायचे झाले तर दिशा पटानीने या चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेतले आहे. तर दुलकर सलमानने 3 कोटी रुपये पशुपती आणि शाश्वत चॅटर्जी या दोन्ही कलाकारांची फी 50 लाख रुपये आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला 'कल्कि 2898 एडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सालारच्या यशानंतर प्रभासचे चाहते खुपच या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT