prabhas starrer salaar movie ott release date netflix 20 january  SAKAL
मनोरंजन

Salaar on OTT: प्रतीक्षा संपली! प्रभासचा ब्लॉकबस्टर 'सालार' या तारखेपासून ओटीटीवर, वाचा सविस्तर

प्रभासचा सालारच्या ओटीटी रिलीजची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Salaar on OTT News: साऊथचा रिबेल स्टार प्रभासने २०२३ ची अखेर सुपरहिट केली. प्रभासच्या 'सालार' सिनेमाने अनपेक्षितरित्या संपूर्ण भारतभरात चांगली कमाई केली. 'सालार'ने आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

प्रभासचा सालार संपूर्ण भारतभरात हाऊसफुल्ल गर्दीत रिलीज झाला. ज्या लोकांना 'सालार'चा अनुभव थिएटरमध्ये घेता आला नाही, त्यांच्याशी आनंदाची बातमी. 'सालार' आता ओटीटीवर रिलीज होत असून सिनेमाचा घरबसल्या आनंद घेता येणार आहे.

प्रभासचा 'सालार' ओटीटीवर! कधी? कुठे

सालार सीझफायर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. सालार नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. उद्या २० जानेवारीपासून सालार तेलगू, कन्नडा, मल्याळम आणि तामिळमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय सालारचं हिंदी आणि इंग्लिश पुढच्या काही दिवसांत नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

सालार सीझफायरच्या ओटीटी रिलीजनंतर सालार पार्ट २ शौर्यांग पर्वम् पुढच्या काही दिवसांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल.

सालारची कथा मैत्रीभोवती फिरते. चित्रपटात प्रभास देवची भूमिका साकारत आहे. तर पृथ्वीराज सुकुमारन वरदराज मन्नारची भूमिका साकारत आहे, जगपती बाबू राजमन्नारच्या भूमिकेत आहे, तर श्रुती हासन 'सालार'मध्ये आद्याची भूमिका साकारत आहे.

'सालार: पार्ट वन - सीझफायर' तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये रिलीज झाला.

'सालार'च्या एक दिवस आधी शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. 'सालार'ने 'डंकी'चा खेळ बिघडला आणि प्रभासच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे.

'डंकी'ने पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींची ओपनिंग दिली, तर 'सालार' रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरक्षणावर निर्णयानंतर माझेच लोक माझ्यावर चिडले, पण जनेतच्या मनासारखा नव्हे तर...; सरन्यायाधीशांनी सांगितला किस्सा

'लोक वारंवार मतदान करून कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचे'; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं महत्त्वाचं विधान

Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानपाठोपाठ अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा; १७ जणांना संधी, पण कर्णधार कोण?

‘Veo 3’ Free : व्हिडिओ एडिटर्ससाठी खुशखबर! ‘Veo 3’ सर्वांसाठी फ्री, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील हजारो महिलांचा हप्ता जूनपासून थांबला; लाडक्या बहिणी ’ संभ्रमात

SCROLL FOR NEXT