Prabhas Getting Married: Esakal
मनोरंजन

Prabhas Getting Married: "आधी लग्न सालारच मग माझं.." बाहूबली प्रभास अडकणार लग्नबंधनात?

Vaishali Patil

Prabhas Getting Married: साऊथ सुपरस्टार प्रभास गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांना प्रभासच्या आगामी 'सालार: पार्ट सीझफायर' या चित्रपटाकडून खुप आशा आहेत.

तर काही दिवसांपुर्वी त्याच्या इंस्टग्राम अकाउंटसोबत कुणी तरी छेडछाड केल्यामुळे त्याची चर्चा होती. आता या सगळ्यात पुन्हा प्रभास एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. बाहूबली प्रभास आता लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे.

इंडस्ट्रीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर प्रभास लग्न करणार आहे. हे कळल्यानंतर त्याचे चाहते खुप आनंदित झाले आहेत. प्रभासच्या जवळच्या नातेवाईकाने त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे. प्रभास त्याचा आगामी चित्रपट 'सालार' प्रदर्शित झाल्यानंतरच लगेचच लग्न करणार आहे.

प्रभासची काकु श्यामला देवीने मीडियासोबत बोलताना सांगितले की, 'आमच्याकडे Durgamma चा आशीर्वाद आहे. देव आपल्या सर्वांची चांगली काळजी घेईल. प्रभास नक्कीच लग्न करणार आहे आणि ते लवकरच होणार आहे. आम्ही तुम्हा सर्वांना लग्नासाठी आमंत्रित करू आणि ते सेलिब्रेट करू''.

मात्र आता प्रभास कुणासोबत लग्न करणार याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नाही. प्रभासते नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहेत. यापुर्वी त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडले गेले होते.

मात्र क्रितीने या बातमीचे खंडण केले होते. त्यासोबत प्रभासचे नाव अनुष्का शेट्टीसोबत अनेकवेळा जोडलं गेलं आहे. दोघांनीही बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच व्हायरल झाल्या होत्या.

तर काही दिवसांपुर्वी प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या लग्नाचे AI फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मात्र दोघांनीही याबाबत कधी वक्तव्य केलेलं नाही.

एकीकडे प्रभासच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत तर प्रभासने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कसलेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे या बातमीला दुजोरा तर देता येणार नाही. मात्र प्रभास याबाबत लवकरच खुलासा करेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रभास अॅक्शन-थ्रिलर सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये दिसणार आहे . हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर तो 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' या चित्रपटात दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT