Prabhas Google
मनोरंजन

24 वर्षीय मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरला प्रभासचा 'राधेश्याम'

राधेश्याम सिनेमाला मिळालेल्या Negative Reviewsनी प्रभासचा हा चाहता नाराज होता असे कळत आहे.

प्रणाली मोरे

'बाहूबली'(Bahubali) फेम प्रभास(Prabhas)ची निस्सिम भक्ती करणारा चाहतावर्ग दक्षिणेत मोठ्या प्रमाणात आहेत. जगभरात इतरत्रही त्यानं आपला चाहतावर्ग निर्माण केलाय यात शंकाच नाही. पण त्याच्या दक्षिणेकडील चाहत्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही याचं एक ताजं उदाहरण सध्या समोर आलं आहे. नुकतंच एका २४ वर्षीय मुलानं प्रभासच्या 'राधेश्याम' सिनेमाला मिळालेल्या Negative Reviewsमुळे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेला प्रभासचा हा चाहता आंध्रप्रदेश येथील कुर्नुल जिल्ह्यातील टिळक नगर येथील रहिवासी होता. त्यानं आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्या केलेल्या प्रभासच्या चाहत्याचं नाव रवी राज असं आहे. तो प्रभासचा खूप मोठा चाहता होता अशी माहिती त्याच्या जवळच्या मित्रपरिवारानं दिली आहे. प्रभासचा 'राधेश्याम' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण सिनेमाला अचानक Negative Reviews जास्त मिळाल्यामुळे प्रभासचा चाहता असलेला रवी राज याला ते सहन झालं नाही. आत्महत्येपूर्वीच त्यानं आपल्या आईला सिनेमाविषयी आणि आपल्या दुःखाविषयी सांगितलं होतं. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे की,राधेश्याम बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. सिनेमा बहुतांशी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे. पुजा हेगडे आणि प्रभासमध्ये जमून आलेली ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. सिनेमाचं संगीतही श्रवणीय असल्यानं संगीत प्रेमींमध्ये प्रसिद्ध झालं आहे. हा एक पिरीयड रोमॅंटिक ड्रामा असून त्यात भाग्यश्री,सथ्यराज,क्रिशनम राजू,जगापथी बाबू,सचिन खेडेकर,प्रियदर्शी,मुरली शर्मा,कुणाल रॉय कपूर असे अनेक कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT