prachi desai instagram
मनोरंजन

प्राची देसाईने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

स्पष्ट नकार दिल्यानंतरही दिग्दर्शकाने पुन्हा केला कॉल

स्वाती वेमूल

मालिकांपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. "मोठ्या चित्रपटाचा प्रोजेक्ट होता आणि त्यातील भूमिकेसाठी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती", असा खुलासा तिने केला. प्राचीने नकार दिल्यानंतरही संबंधित दिग्दर्शकाने पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचंही तिने सांगितलं.

'बॉलिवूड बबल' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मोठ्या चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी माझ्याकडे थेट शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. पण मी साफ नकार दिला होता. स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्या दिग्दर्शकाने मला पुन्हा कॉल केला होता. तेव्हासुद्धा मला तुमच्या चित्रपटात काडीचा रस नाही, असं सांगत मी ऑफर नाकारली."

हेही वाचा : एका दिवसात चार सेलिब्रिटींना झाला कोरोना

प्राची नुकतीच 'सायलेंस : कॅन यू हिअर इट?' या चित्रपटात झळकली. यामध्ये तिने एका पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती. प्राचीने २००६ मध्ये 'कसम से' या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि दोन वर्षांतच तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली. २००८ मध्ये तिने 'रॉक ऑन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'बोल बच्चन' आणि 'अजहर' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT