मनोरंजन

Prajakta Gaikwad : 'प्राजक्ता राजकारणात जाऊ नकोस'! अभिनेत्रीला कुणाचा सल्ला?

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एका कार्यक्रमाच्या दिवशी देखील फु बाई फू ची टीमनं उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

सकाळ डिजिटल टीम

Prajakta Gaikwad marathi actress politics entry CM Eknath Shinde : मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार राजकारण्यांच्या भेटीला जात असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एका कार्यक्रमाच्या दिवशी देखील फु बाई फू ची टीमनं उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. यावेळी काही कलाकारांनी व्यक्त केलेल्या भावना देखील अनेकांच्या चर्चेचा विषय होता. काल तुझ्यात जीव रंगला मालिकेचे कलाकार राणादा फेम हार्दिक जोशी आणि पाठकबाई फेम अक्षया देवधर यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सध्या राज्यातील राजकारण फारच वेगळ्या प्रकारे बदलते आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांना मोठा झटका बसला आहे. अशावेळी कलाकार मंडळी देखील गोंधळून गेले आहेत. त्यातील काही सेलिब्रेटींनी या परिस्थितीवर भाष्य करण्याचे धाडस दाखवले आहेत. त्यात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा उल्लेख केला आहे. तिनं येत्या काळात राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान प्राजक्ताच्या त्या फोटोनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर ग्रेट भेट”, असे कॅप्शन प्राजक्ता गायकवाडने या फोटोला दिले आहे. त्यानंतर त्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.

एकानं लिहिलं आहे की, प्राजक्ता तू चुकूनही राजकारणात प्रवेश करु नकोस. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तू आता आमदार होणार की काय...भावी आमदार म्हणून त्या नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या नावाचा उल्लेख केला आहे. प्राजक्ताच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्या मालिकेमध्ये तिनं महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT