prajakta mali 108 surynamskar on international yoga day 2023 viral video sakal
मनोरंजन

International Yoga Day: प्राजक्ता माळीचा नाद नाय! १०८ सूर्यनमस्कार घालत चाहत्यांनाही करायला लावला योगा..

प्राजक्ताने यंदाही केला १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम..

नीलेश अडसूळ

(prajakta mali 108 surynamskar : फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत प्राजक्ता माळी आणि योगविद्या हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही. ती सातत्याने व्यायाम आणि योगाचे महत्व सांगत असते. अनेकदा ती योग करतानाचे व्हिडिओही शेयर करते.

विशेष म्हणजे दरवर्षी ती जागतिक योग दिनी १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करते आणि तो पूर्णत्वासही नेते. आजही जगभरात जागतिक योग दिन साजरा होत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने १०८ सूर्यनमस्कार घालत आजचा दिवस साजरा केला आहे.

एवढेच नाही तर थेट लाईव्ह सूर्यनमस्कार करत आपल्या चाहत्यांनाही तिने सूर्यनमस्कार घालणे भाग पाडले. प्राजक्ताचाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या विशेष विक्रमासाठी अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे.

(prajakta mali 108 surynamskar on international yoga day 2023 viral video nsa95)

योग साधनेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे अनेक कलाकार आपल्याला वारंवार सांनगत असतात. (International Yoga Day 2023) सोशल मीडीयावर बॉलीवूड सेलिब्रेटीही आपले फोटो शेयर करत योगचे महत्व पटवून देत असतात. यामध्ये आपली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीही मागे नाही.

योग साधनेविषयी ती वारंवार बोलत असते. आज योगा डे निमित्त तिने चक्क 108 सूर्य नमस्कार घातले आहेत. गेल्यावर्षीही तिने हा विक्रम केला होता. विशेष म्हणजे पुरावा म्हणून याचा खास व्हिडिओ तीने शेयर केला आहे. सोबत एक खास कमेंटही तिने केली आहे.

''सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी १०८ सूर्यनमस्कार घातले… त्याचा हा पुरावा... बाकी योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा नाहीत..'' अशी भन्नाट कमेंट तिनं या व्हिडिओवर केली आहे.

प्राजक्ताने कालच याबाबत आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. मी सकाळी संत वाजता १०८ सूर्यनमस्कार घालायला येणार आहे, तुम्हीही या असे ती म्हणाली होती. त्यानुसार प्राजक्ताने आपला संकल्प पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे यावेळी चाहत्यांनीही किती सूर्यनमस्कार घातले हे प्राजक्ताला कमेंट करत कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT