prajakta mali enjoying in london and shared post about her world tour sakal
मनोरंजन

जगच काय.. चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघायचंय.. प्राजक्ता माळीची भलतीच स्वप्नं..

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या लंडन दौऱ्या दरम्यान ही खास पोस्ट लिहिली आहे..

नीलेश अडसूळ

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तसेच चाहत्यांशी संवादही साधत असते. गेले काही दिवस ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. पण त्यातून थोडी विश्रांती घेऊन प्राजक्ता लंडन वारीला गेली आहे. यावेळी लंडन मध्ये जाऊन तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने थेट मंगळावर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये गेल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. या व्हिडीओद्वारे तिने तिची एक इच्छा देखील बोलून दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ आणि कॅप्शन सध्या बरेच चर्चेत आहे. ( prajakta mali enjoying in london and shared post about her world tour)

प्राजक्ता म्हणते, 'फिरायला मिळालेला इंग्लंड हा १३ वा देश. (खात्री आहे, फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर देश मोजत असणार… एक आईबरोबरची दुबई trip सोडल्यास सगळ्या trips कामानिमित्त किंवा sponsored होत्या, देवाचे किती म्हणून आभार मानू. #मध्यमवर्गीयांचीसुखं.)

'स्वतःच्या अथवा इतरांच्या पैशाने, कसही चालेल; पण सगळे देश फिरायची इच्छा आहे…जगचं काय, चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघण्याची इच्छा आहे..अर्थात; देव जे जे दाखवेल ते आणि तेवढंच बघायला (भोगायला- त्यागायला) तयार आहे. चला आता फार फिलॅासॅाफी झाडत बसत नाही, लंडनवारी चे फोटो शेअर करत राहीन. तुम्हीही वर्च्युअल वारी करून घ्या,' असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT