prajakta mali share memory of julun yeti reshimgathi marathi serial with lalit prabhakar  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींच्या आयुष्यात... प्राजक्ता माळीची खास पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे

Devendra Jadhav

Prajakta Mali News: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताने आजवर मालिका, सिनेमा आणि वेबसिरीजमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

प्राजक्ता आज लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिने कारकीर्दीच्या सुरुवातीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतुन केली. या मालिकेला आज १० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केलीय.

प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता लिहीते, "आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली.
#timeflies
.
त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता. आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम.

प्राजक्ता माळी पुढे लिहीते, "आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या.)
आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत.
#आदित्य-मेघना"

प्राजक्ता माळी शेवटी लिहीते, "महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. #बाबाजी लक्ष असू द्या"

प्राजक्ताच्या या मालिकेचे आजही खुप चाहते आहेत. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतेय. याशिवाय प्राजक्ताचा काहीच दिवसांपुर्वी तीन अडकून सीताराम हा सिनेमा रिलीज झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT