prajakta mali shared his look in upcoming movie Teen Adkun Sitaram maharashtrachi hasyajatra  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: "प्रेमात पडले आणि कळलंच नाही"; असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?

प्राजक्ता माळीच्या कॅप्शनने ती प्रेमात पडलीये असा प्रश्न विचारण्यात आलाय

Devendra Jadhav

Prajakta Mali News: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. वाह दादा वाह म्हणत खळखळून हसणारी प्राजू सर्वांची लाडकी अभिनेत्री.

प्राजक्ताने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. "प्रेमात पडले आणि कळलंच नाही की इतकी कशी अडकले. कुणाच्या? इश्श! कळेलच", असं कॅप्शन देत प्राजक्ताने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळवलंय. काय आहे प्रकरण? आम्ही तुम्हाला सांगतो.

(Prajakta Mali shared his look in upcoming movie Teen Adkun Sitaram)

प्राजक्ता माळीच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

प्राजक्ता माळीने असं भलतंच कॅप्शन दिल्याने अनेकांना ती प्रेमात पडलीये? असं वाटत आहे. पण असं काही नाहीये. प्राजक्ताने तिच्या आगामी सिनेमाचा तिचा लूक व्हायरल झालाय.

प्राजक्ता माळीचा तीन अडकून सीताराम या आगामी सिनेमातला तिचा लूक रिव्हिल केलाय. प्राजक्ता तीन अडकून सीताराम सिनेमात रेवाची भुमिका साकारत आहे. प्राजक्ताने गुलाबी रंगाचा स्टायलिस्ट टी - शर्ट घेतलं असुन त्यात सुंदर दिसतेय.

प्राजक्ताच्या तीन अडकून सीताराम सिनेमाबद्दल

तीन अडकून सीताराम… नाव ऐकून जरा वेगळंच वाटलं ना? हे असं कसं नाव? तर हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ तुम्हाला हा चित्रपट आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात कोण प्रमुख भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तीन अडकून सीताराम या तारखेला रिलीज होणार

काहीच दिवसांपुर्वी झळकलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की !

दुनिया गेली तेल लावत, अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT