prajakta mali shared photo with sri sri ravishankar art of living course fans passes funny comment on post  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: तु संन्यासी होणार वाटतंय! प्राजक्ताच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

करिअरच्या शिखरावर असताना प्राजक्ता माळी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करतेय.

Devendra Jadhav

Prajakta Mali Art Of Living News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताचं करिअर सध्या सुसाट सुरु आहे. करिअरच्या शिखरावर असताना प्राजक्ता माळी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करतेय.

प्राजक्ता सध्या श्री श्री रवीशंकर यांच्या त्रिवेणी आश्रमात पोहोचली आहे. प्राजक्ताने काहीच दिवसांपुर्वी पोस्ट शेअर करत प्राजक्तानं मौनव्रत धारण केल्याचा खुलासा केला. आता प्राजक्ताने काही नवीन फोटो पोस्ट केलेत. हे फोटो पाहून प्राजक्ताच्या फॅन्सनी मात्र भन्नाट कमेंट केल्यात

(prajakta mali shared photo with sri sri ravishankar art of living course)

काय आहे प्राजक्ताचा नवीन फोटो

प्राजक्ताने माळीने सोशल मिडीयावर नवीन फोटो पोस्ट केलाय. यात प्राजक्ता सोबत गुरु दिसत आहेत. आणि प्राजक्ता त्यांच्या चरणांशी बसली आहे. हे फोटो पोस्ट करुन प्राजक्ता लिहीते..

आर्ट ऑफ लिव्हींगचा अॅडव्हान्स कोर्स पुर्ण केलाय. ३ महिन्यातुन एकदा करावीच लागणारी ही खास गोष्ट. या कोर्समध्ये प्राणायाम, योगा, मेडीटेशन, संगीत, पंचकर्मा, निसर्ग, सात्विक जीवनशैली आणि सात्विक आहार अशा गोष्टी समाविष्ट आहेत. अशी माहिती देत प्राजक्ताने या कोर्सचे तपशील शेअर केलेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

"प्राजक्ता तू सन्यासी होणार वाटतंय", "महाराजांच्या नादी लागून भले भले येडे झाले बाई", अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी प्राजुच्या या नवीन भुमिकेवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात.

याशिवाय.. प्राजु खरंच तू खूप भारी आहेस, खूप कौतुक, एवढ्या बिझी रूटीन मध्ये पण दर 3 महिन्यातून वेळ काढून advance courses करतेस त्याबद्दल..

खरंच प्राजक्ता G आपल्या आयुष्यात ध्यान शिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही तुमचे दोन गुरु आणि तुमचे मित्र परिवार खूप जास्त आवडले आहेत मला,

अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी प्राजुचं कौतुक केलंय

प्राजक्ताचा फोन बंद

प्राजक्ताने काहीच दिवसांपुर्वा तिचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यात तिने लिहिलं आहे की, "आयुष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींगचं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल", असं म्हणत प्राजक्तानं आश्रमातील फोटो शेअर केले आहे.

प्राजक्तानं सुरुवातीला आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स केला होता. आता ती याच कोर्सची अँडवान्स ट्रेनिंग घेण्यासाठी गेली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगतिले आहे की, तिचा फोनही काही दिवस किंवा तास बंद असेल.

या पोस्टसोबतच तिने #गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती असे काही हॅशटॅगही वापरले आहेत. प्राजक्ता सध्या ब्रेकवर असुन ती लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT