prajakta mali special post on samir chaugule happy birthday from maharashtrachi hasyajatra ashadhi ekadashi 2023  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: आज आषाढी आणि तुझा ५० वा वाढदिवस, प्राजक्ताने सांगितला समीरच्या बर्थडेचा दुग्धशर्करा योग

आज समीर चौगुलेंचा वाढदिवस.

Devendra Jadhav

Prajakta Mali birthday post on Samir Chaugule News: समीर चौगुले महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील महत्वाचे अभिनेते. गेली ४ - ५ वर्ष महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरु आहे. या हास्यजत्रेत आजवर समीर चौगुले विविध भूमिका साकारत आहेत.

समीर चौगुले जेव्हा मंचावर येतात तेव्हा खळखळून हसायला येतं. त्यांचं लोचन मजनू भूमिका असो कि फुटाणे चाळीचा मुलीचा बाप अनेक व्यक्तिरेखा समीर चौगुले साकारत. आज समीर चौगुलेंचा वाढदिवस.

(prajakta mali special post on samir chaugule happy birthday from maharashtrachi hasyajatra ashadhi ekadashi 2023)

समीर चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने त्यांच्याविषयी पोस्ट केलीय. पोस्ट करून प्राजक्ता लिहिते... दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला…

खरचं…, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस… तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली… आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले.. आणि ही ओळख आयुष्यभर राहील, असं वाटतं.

प्राजक्ता पुढे लिहिते... "तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो..,

आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!" अशाप्रकारे प्राजक्ताने समीर चौगुलेंना शुभेच्छा दिल्यात.

प्राजक्ता आणि समीर चौगुले यांचं एक खास नातं आहे. या दोघांची एक वेगळी केमिस्ट्री प्रेक्षकांनी पाहिली. वाह दादा वाह म्हणणारी प्राजक्ता समीर चौगुलेच्या प्रत्येक स्किटला भरभरून दाद असते.

प्राजक्ताचं वाह दादा वाह इतकं लोकप्रिय झालंय कि कोणाला दाद द्यायची म्हटली तर आपसूक हे तोंडात येतं. आज समीर दादाच्या वाढदिवसाला प्राजक्ताने लिहिलेली पोस्ट पाहून तिच्या मनात दादाबद्दल किती प्रेम आणि आदर आहे, हेच दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT