prajakta mali teen adkun sitaram marathi movie teaser out now maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Teen Adkun Sitaram: "चीनने जगाची ठासली अन् आपण.."; प्राजक्ता माळीच्या तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर एकदा पाहाच

प्राजक्ता माळीच्या आगामी तीन अडकून सीताराम सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Prajakta Mali Upcoming Movie : प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सुत्रसंचालन करतेय. प्राजक्ता माळीच्या आगामी तीन अडकून सीताराम सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे अशा कलाकारांची प्रमुख भुमिका असलेला तीन अडकून सीताराम सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

तीन अडकून सीतारामच्या टीझरमध्ये काय?

तीन अडकून सीतारामच्या टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबाशी संबंधित असुन आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. ॉ

‘दुनिया गेली तेल लावत’ असा काहीसा ॲटिट्यूड असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात काहीतरी वादळ आल्याचे दिसत असून हे वादळ कसे थांबणार, हे सिनेमात बघायला मिळेल

सिनेमाचा टिझर पाहता कलाकारांची ही दमदार फळी आपल्या भन्नाट अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणणार आहेत.

टिझरमध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे दिसत असले तरी चित्रपटात आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

खळखळून हसवणारा तीन अडकून सीताराम सिनेमा

तीन अडकून सीताराम चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’ नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच.

यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. ‘तीन अडकून सीताराम’चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.’’

तीन अडकून सीताराम सिनेमाची रिलीज डेट काय?

तीन अडकून सीताराम चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच उत्तर आपल्याला २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT