Prajakta Mali video Post Instagram
मनोरंजन

Prajakta Mali: 'फक्त दोन दिवस वाट पहा..'; प्राजक्तानं व्हिडीओ शेअर करत वाढवली नेटकऱ्यांची उत्सुकता

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच वैयक्तिक आणि करिअर संदर्भातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर करताना दिसते.

प्रणाली मोरे

Prajakta Mali: प्राजक्ता माळी हे सध्याचं चर्चेतलं नाव आहे. सोशल मीडियावर तर तिचं फॅन फॉलोइंग भलतंच वाढताना दिसत आहे. 'रानबाजार' या वेबसिरीजनंतर तर तिच्या बोल्ड अभिनयावर अनेकांनी कौतूकाचा वर्षाव केलेला आपण पाहिला असेल. आता फक्त कौतूकच होतं प्राजक्ताचं तर असं काही नाही बंर का. सोशल मीडियावर जेव्हा-जेव्हा ती राजकीय-सामाजिक भूमिका स्पष्ट करते तेव्हा-तेव्हा ट्रोलही होताना दिसते. आता प्राजक्ता पुन्हा चर्चेत आलीय ते सोशल मीडियावर तिनं पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे.( Prajakta Mali video Post)

प्राजक्तानं पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती सुरुवातीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसते. आणि थेट म्हणतेय...''फक्त काही दिवस वाट पहा...मी या नवीन वर्षात तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतेय. आशा आहे तुम्ही माझ्या या नवीन प्रोजेक्टचं देखील कौतूक कराल''. बस्स....प्राजक्तानं हा व्हिडीओ पोस्ट केला अन् चाहत्यांना आता उत्सुकता लागलीय ती ६ जानेवारीची. प्राजक्ता नेमकी काय घोषणा करते याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत. आता आम्ही थोडीशी तुम्हाला यांदर्भात कल्पना देतो की नेमकी प्राजक्ता कशाविषयी घोषणा करणार आहे,

काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं छान पारंपरिक दागिने घालून काही फोटो पोस्ट केले होते. तिनं आपलं पारंपरिक दागिन्यांवरचं प्रेमही बोलूनही दाखवलं होतं.अर्थात त्यात झकासच दिसत होती ती, नो डाऊट. पण आता तिनं याच पारंपरिक दागिन्यांचा ब्रान्ड आपल्या चाहत्यांसाठी घेऊन यायचं ठरवलं आहे..ज्याचं नाव आहे 'प्राजक्तराज'...माननीय राज ठाकरे यांच्या हस्तेच प्राजक्ताच्या या नवीन ब्रॅन्डचं ओपनिंग होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT