prajakta mali viral video on kbc 15 amitabh bachchan marathi actress SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ताला पाहताच फॅन गोंधळला! केलं असं काही की अमिताभ बच्चन म्हणाले, अरे महाशय...

प्राजक्ता माळीचा केबीसीमधला व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील सध्याची लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताने आजवर विविध सिनेमांंमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे.

प्राजक्ताला भेटायला तिचे फॅन्स उत्सुक असतात. प्राजक्ताच्या अशाच एका फॅनचा किस्सा केबीसीच्या मंचावर घडला. जेव्हा अमिताभ बच्चनसमोर बसलेल्या एका स्पर्धकाने प्राजक्ताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्या फॅनने प्राजक्ताला पाहताच असं काही केलं की, केबीसीच्या सेटवर एकच धम्माल उडाली. वाचा सविस्तर...

प्राजक्ताला पाहताच फॅन गोंधळला

केबीसी 15 च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाची इच्छा पूर्ण केली. अमिताभ यांनी केबीसीच्या मंचावरुन थेट प्राजक्ता माळीला व्हिडीओ कॉल लावला. लाडक्या अभिनेत्रीला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातुन का होईना पण समोर पाहत असल्याने स्पर्धकाला खुप आनंद झाला.

स्पर्धकाने स्क्रीनकडे पाहिलं पण कॅमेरा वेगळ्या ठिकाणी होता. अमिताभ त्याला म्हणाले, "महाशय इकडे बघा. कॅमेरा या दिशेला आहे."

अशाप्रकारे प्राजक्ताला पाहताच फॅनची एकच तारांबळ उडाली.

अमिताभ यांच्यासमोर प्राजक्ताने फॅनला दिला शब्द

प्राजक्ता माळीने फॅनशी संवाद साधला. अभिनय, सूत्रसंचालन, प्राजक्तराज अशा अनेक गोष्टी सांभाळताना योगा आणि प्राणायामची मदत होते, असं प्राजक्ता म्हणाली. याशिवाय प्राजक्ताने त्याला शब्द दिला की, जर तु इथे जिंकलास तर मी स्वतः तुला येऊन भेटेल. तू जिंक मित्रा, लढ!

अशा शब्दात प्राजक्ताने स्पर्धकाला शब्द दिला आणि त्याला जास्तीतजास्त रक्कम जिंकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT