Prajakta Mali's special post on the Independence Day 2023 wishes everyone maharashtrachi hasyajatra  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की... प्राजक्ता माळीची देशाच्या स्वातंत्र्यदिनी खास पोस्ट चर्चेत Independence Day 2023

प्राजक्ता माळीने देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी सर्वांना शुभेच्छा दिल्यात

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सक्रीय असते. प्राजक्ता माळीला आपण आजवर अनेक भुमिकांमधुन अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळीने आजवर विविध भुमिकांमधुन तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान मिळवलंय.

प्राजक्ता माळीने आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्यात. प्राजक्ताने साने गुरुजींची कविता शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

(Prajakta Mali's special post on the Independence Day 2023)

प्राजक्ता माळीने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा

बलसागर भारत होवो..
विश्वात शोभून राहो..!
.
वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन
या बंधू सहाय्याला हो.. !
.
या उठा करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरूषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो..!
- साने गुरूजी

"भारतावर किती प्रेम आहे, हे शब्दात सांगू शकत नाही.
गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की या महान भारतात जन्मले. भारताच्या उत्कर्षासाठी झटत राहू, हीच प्रतिज्ञा करू. भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो. जय हिंद.. वंदे मातरम्" अशी पोस्ट करत प्राजक्ताने स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

हास्यजत्रा टीमकडून प्राजक्ताच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

प्राजक्ताने सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. यात पहायला मिळतं की, प्राजक्ताच्या घरी समीर चौगुले, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, चेतना भट, वनिता खरात अशी संपूर्ण टीम उपस्थित होती.

यावेळी समीर चौगुलेंनी प्राजक्ताचं औक्षण केलं. याशिवाय प्राजक्ताने सचिन गोस्वामींना वाकुन नमस्कार केलेला दिसला. पुढे प्राजक्ताने केक कापुन वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलेलं दिसलं.

प्राजक्ताची फॅमिली पिकनीक

प्राजक्ताने काही दिवसांपुर्वी फोटो शेयर करुन कर्ज काढून तो फार्महाउस घेतल्याचं सांगितलं होत. आता तिने हा फार्महाउस इतर पर्यटकांसाठीही खुला केला आहे. याशिवाय या फार्महाउसवर तिच्या कुटूंबासोबत विकेंड एन्जॉय करतांना दिसली.

सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या प्राजक्तानं तिच्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या फॅमिलीसोबत काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोत ती तिच्या फार्महाउसवर पावसाचा आनंद घेताना दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire : लोक जळत होते, खिडकी फोडली अन् पाईपच्या साहाय्याने खाली उतरली... लखनऊ आगीतील युवतीची वेदनादायक कहाणी

Arabian Sea Monsoon : मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Lalan Singh: सहारनपूरच्या जंगलात मध्यरात्री सुरू झाला गोळीबार... पोलिसांनी ओळखला तोच कुख्यात ललन सिंह; काही मिनिटांत संपली वर्षांची दहशत

Latest Marathi News Live Update : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ढगफुटीसदृश पाऊस; शिऊर बंगला-नांदगाव मार्गावरील पूल गेला वाहून

Ahilyanagar Crime: मित्रा कशाला वाद घालतो, भांडणात मध्यस्थीला गेला; ३२ वर्षीय तरुणाला १६ वर्षांच्या मुलानं संपवलं

SCROLL FOR NEXT