Prakash Jha Latest News Prakash Jha Latest News
मनोरंजन

चित्रपटच चांगले नव्हते मग बहिष्काराबद्दल काय बोलायचं; प्रकाश झा स्पष्टच बोलले

लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन हे अप्रतिम चित्रपट होते हे सांगणारे ५ लोकांना आणा

सकाळ डिजिटल टीम

Prakash Jha Latest News दिग्दर्शक आणि अभिनेते प्रकाश झा (Prakash Jha) सध्या ‘मट्टो की सैकिल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटात प्रकाश झा भूमिका साकारताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर केल्यानंतर ‘मट्टो की सायकल’ आता रिलीजच्या अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या बहिष्काराच्या (Boycott) ट्रेंडवर त्यांनी भाष्य केले आहे.

जेव्हा जेव्हा एखादी सामाजिक समस्या असते तेव्हा काहींना ती आवडेल आणि काहींना नाही. आज सोशल मीडिया असल्याने ही बाब समोर येते. परंतु, ही काही नवीन गोष्ट नाही. याउलट तुम्ही चांगला चित्रपट बनवलात, प्रामाणिकपणे बनवलात तर ती पहिली गोष्ट त्याच्याबद्दलच असेल. बहिष्काराचा काय परिणाम होतो किंवा नाही हे सांगता येत नाही. कारण, ज्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची चर्चा झाली ते चांगले नव्हते. जेव्हा चित्रपट चांगले नव्हते, तेव्हा बहिष्काराचा अर्थ काय?, असे प्रकाश झा (Prakash Jha) म्हणाले.

लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन हे अप्रतिम चित्रपट होते हे सांगणारे ५ लोकांना आणा आणि उभे करा. कोणी म्हणणार नाही हे अप्रतिम चित्रपट आहे. लगान बॉयकॉट (Boycott) झाली असती, दंगल किंवा ३ इडियट्स झाली असती तर गोष्ट झाली असती. चित्रपटावर बहिष्काराचा प्रभाव झाला की नाही हे मोजण्यासाठी चित्रपट अप्रतिम बनला पाहिजे. तेव्हाच समजू येईल चित्रपटावर बहिष्काराचा परिणाम झाला आहे, असेही प्रकाश झा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT