Prakash Raj love story married with pony verma with age gap 12 years at age for 50 he had baby  sakal
मनोरंजन

Prakash Raj Birthday: १२ वर्ष लहान मुलीशी लग्न आणि ५० व्या वर्षी पाळणा.. प्रकाश राज यांचा नाद नाय!

प्रकाश राज यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

नीलेश अडसूळ

prakash raj birthday: बॉलीवुड सिनेमातून झळकलेला आणि दमदार अभिनयाने घराघरात पोहोचलेला परिचित आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेते प्रकाश राज.. त्यांची सिंघम मधली भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवुड गाजवणाऱ्या या अभिनेत्याचा आज 58 वा वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास बात..

दाक्षिणात्य चित्रपटांपासून करिअरची सुरुवात करणारे अभिनेते प्रकाश राज आता बॉलिवूडमध्येही सुपरिचित आहेत. त्यांनी कधी खलनायक साकारून प्रेक्षकांना घाबरवलं तर कधी कॉमेडियन बनून त्यांना हसवलं.

'सिंघम', 'वॉन्टेड' यांसारख्या चित्रपटांत काम करून त्यांनी बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे प्रकाश आपले विचार व्यक्त करून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडतात. अशा प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कोणाला माहित नाही.

(Prakash Raj love story married with pony verma with age gap 12 years at age for 50 he had baby )

प्रकाश राज यांची लव्ह लाईफ काहीशी भन्नाट आहे. बेंगळुरूमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्रकाश राज यांचा जन्म झाला. अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी हे यश मिळवलं. पुढे १९९४ मध्ये त्यांनी ललिता कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. ललिता आणि प्रकाश राज यांना दोन मुली आहेत.

घटस्फोटानंतर त्यांनी त्यांनी वयाने १२ वर्षांनी लहान असलेल्या कोरिओग्राफरशी दुसरं लग्न केलं आहे. तिचे नाव पोनी वर्मा असून ती पंजाबची आहे. असं म्हणतात की पोनीशी लग्न करण्याआधी त्यांनी आपल्या दोन मुलींची आधी परवानगी घेतली होती. 

पोनी ही कोरिओग्राफर असून विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर'मधील 'उलाला उलाला' या प्रसिद्ध गाण्याची कोरिओग्राफी तिने केली आहे. एका चित्रपटाच्या सेटवर पोनी आणि प्रकाश राज यांची पहिल्यांदा भेट झाली.

"माझ्या एका चित्रपटातील गाण्यासाठी पोनी कोरिओग्राफी करत होती. आम्ही दोघं एकमेकांना आवडू लागलो, तेव्हा मी माझ्या आईला आणि मुलींना तिच्याविषयी सांगितलं. मुलींची रितसर परवागनी घेतल्यानंतरच मी पोनीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घातली", असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. २०१० मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि वयाच्या ५० व्या वर्षी प्रकाश राज पुन्हा एकदा बाबा झाले. पोनी आणि प्रकाश यांना एक मुलगा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT