prakash raj 
मनोरंजन

प्रकाश राज यांनी १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी केलंय लग्न

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटांपासून करिअरची सुरुवात करणारे अभिनेते प्रकाश राज बॉलिवूडमध्येही सुपरिचित आहेत. त्यांनी कधी खलनायक साकारून प्रेक्षकांना घाबरवलं तर कधी कॉमेडियन बनून त्यांना हसवलं. 'सिंघम', 'वॉन्टेड' यांसारख्या चित्रपटांत काम करून त्यांनी बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कोणाला माहित नसेल. त्यांनी वयाने १२ वर्षांनी लहान असलेल्या कोरिओग्राफरशी दुसरं लग्न केलं. बेंगळुरूमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्रकाश राज यांचा जन्म झाला. १९९४ मध्ये त्यांनी ललिता कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. ललिता आणि प्रकाश राज यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर त्यांनी पोनी वर्माशी लग्नगाठ बांधली. पोनी ही त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान आहे. पोनीशी लग्न करण्यासाठी त्यांनी आपल्या दोन मुलींची आधी परवानगी घेतली. 

कशी झाली पोनीशी भेट?
पोनी ही कोरिओग्राफर असून विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर'मधील 'उलाला उलाला' या प्रसिद्ध गाण्याची कोरिओग्राफी तिने केली आहे. एका चित्रपटाच्या सेटवर पोनी आणि प्रकाश राज यांची पहिल्यांदा भेट झाली. "माझ्या एका चित्रपटातील गाण्यासाठी पोनी कोरिओग्राफी करत होती. आम्ही दोघं एकमेकांना आवडू लागलो, तेव्हा मी माझ्या आईला आणि मुलींना तिच्याविषयी सांगितलं. मुलींची रितसर परवागनी घेतल्यानंतरच मी पोनीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घातली", असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. २०१० मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि वयाच्या ५० व्या वर्षी प्रकाश राज पुन्हा एकदा बाबा झाले. पोनी आणि प्रकाश यांना एक मुलगा आहे. 
 

फक्त ३०० रुपये कमवायचे
प्रकाश राज हे आता जरी चित्रपटसृष्टीत मोठं नाव असलं तरी एकेकाळी त्यांनीही फार संघर्ष केला आहे. ते आधी थिएटरमध्ये काम करायचे आणि त्यावेळी त्यांना स्टेज शोसाठी फक्त ३०० रुपये मानधन मिळायचं. त्यांनी आतापर्यंत कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळी आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

दिग्दर्शकामुळे बदललं आडनाव
प्रकाश राज यांनी 'बिसिलु कुदुरे' नावाच्या एका टीव्ही शोमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र तामिळ भाषेतील चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यांनी १९९४ मध्ये 'डुएट' या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्याचवेळी त्यांनी आपलं आडनाव बदललं. दिग्दर्शकाच्या सल्ल्यानुसार त्यांनी राय हे आडनाव बदलून प्रकाश राज असं केलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT