prakash raj making fun of kangana ranaut tejas video kangana give reply to haters SAKAL
मनोरंजन

Prakash Raj on Kangana: "भारताला २०१४ ला स्वातंत्र्य मिळालं म्हणुन", प्रकाश राजने उडवली खिल्ली, कंगनाही भडकुन म्हणाली...

प्रकाश राजने कंगनाची खिल्ली उडवल्याने तिनेही तिच्यावर टिका करणाऱ्यांना सुनावलंय

Devendra Jadhav

Prakash Raj on Kangana Ranaut: कंगनाचा तेजस सिनेमा अलीकडेच सगळीकडे रिलीज झाला. तेजस सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करेल अशी कंगनाला अपेक्षा होती.

पण तेजसने बॉक्स ऑफीसवर अपेक्षित यश मिळवता आलं नाही. अशातच अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनाची खिल्ली उडवली आहे. त्यावर कंगनाने सुद्धा तिच्यावर टिका करणाऱ्यांना सुनावलंय. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणुन घ्या.

(prakash raj making fun of kangana ranaut tejas video kangana give reply to haters)

प्रकाश राजने उडवली कंगनाची खिल्ली

कंगनाने आज सकाळी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओत कंगनाने सर्वांना तिचा तेजस सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं होतं.

या व्हिडीओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर नुकतंच साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता प्रकाश राज यांनीही कंगनाला फैलावर घेतलं. प्रकाश राज कंगनाच्या व्हिडिओवर म्हणाले, 'भारताला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले... थोडे थांबा... हळूहळू सर्वकाही बदलेल.'

मुद्दा असा की, कंगनाने एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं की, "२०१४ मध्ये भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं", याच वक्तव्याचा संदर्भ देत कंगनावर प्रकाश राज यांनी टिका केली

कंगनाने दिले उत्तर

कंगनाने काहीच वेळापुर्वी तिच्यावर टिका करणाऱ्यांना उत्तर दिले, "जे लोकं मला वाईट बोलत आहेत त्यांचं जीवन नरकासारखं वाईट होईल. कारण ते मला दररोज प्रगती करताना पाहतील. माझ्याकडे काहीही नसताना मी वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडले. मी सातत्याने स्वतःच माझे नशीब लिहित इथवर आलंय.

कंगनाचा तेजस हिट होणार की फ्लॉप?

कंगना पुढे म्हणाली. "याशिवाय महिला सक्षमीकरण आणि या देशासाठी मला काहीतरी करायचे आहे याचे बरेच पुरावे आहेत. माझ्यावर टिका करणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं व्हावं म्हणुन त्यांनी माझ्या फॅन क्लबमध्ये सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या शुभचिंतकांनी अशा लोकांशी चांगले वागावे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवावा असे मला वाटते."

आता कंगनाच्या तेजसला याचा फायदा होणार की सिनेमा अपयशी होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT