Prakash Raj Cyclone Michaung Chennai Rains Delayed ED Day:  sakal
मनोरंजन

Prakash Raj: 'पनौती अन् भक्तांसाठी वाईट बातमी..' ईडी प्रकरणात अडचणीत सापडलेल्या प्रकाश राज यांनी पुन्हा मारला टोमणा!

Prakash Raj Cyclone Michaung Chennai Rains Delayed ED Day: अभिनेते प्रकाश राज हे सध्या मनी लाँड्रिंग आणि ईडी चौकशीमुळे चर्चेत आहेत.

Vaishali Patil

Prakash Raj Cyclone Michaung Chennai Rains Delayed ED Day: अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतात. राजकारणाशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश राज खुलेपणाने भाष्य करतात.

सध्या प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते चित्रपट किंवा वक्तव्यामुळे नाही तर मनी लाँड्रिंग आणि ईडी चौकशीमुळे चर्चेत आहेत.

प्रकाश राज यांना तिरुचिरापल्ली-आधारित ज्वेलर्स समूहाविरुद्ध 100 कोटी रुपयांच्या पोन्झी आणि फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते आणि आज त्यांना चौकशीसाठी हजर रहायचे होते.

मात्र आता चेन्नईत मिचॉन्ग चक्रीवादळामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मिचॉन्ग चक्रीवादळाने नुकसान केले आहे. मात्र यामुळे प्रकाश राज यांना कसा फायदा झाला आणि त्यांनी पुन्हा ईडीला का टोमणा मारला हे जाणुन घेवूया.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईतील विमानतळ मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रकाश राज हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जावू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी एक x पोस्ट करत ईडीवर आणि टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

प्रकाश राज यांनी सोमवारी चेन्नई विमानतळाच्या एका ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात लिहिले आहे की, मिचॉन्गमुळे मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत फ्लाईट बंद राहणार आहेत.

प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रिय #पनौती आणि #भक्तांसाठी दुःखद बातमी.. उद्या माझा ED दिवस आहे.. पण #chennairains #CycloneMichaung Spoil Sport खेळत आहे. तुम्हाला वाट पहावी लागेल.. पुढील अपडेटसाठी कृपया संपर्कात रहा..'

काय आहे प्रकरण
प्रकाश राज यांच्याविरुद्धचा खटला तिरुचिरापल्लीस्थित भागीदारी फर्म प्रणव ज्वेलर्सशी संबंधित आहे. ईडीने या फर्मवर २० नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता. या कारवाईत ईडीने 23.70 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त केल्याचा दावा केला होता.

अभिनेते प्रकाश राज या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यामुळे त्यांना याप्रकरणी ईडीने समन्स पाठवले होते . डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चेन्नईत येथे ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आता या वादळामुळे ते ईडी समोर हजर राहू शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT